Join us

Video : मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँच्या 'उमराव जान' लूकनं नेटिझन्सना केलं घायाळ

भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ सध्या चांगलीच चर्चेत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 12:20 IST

Open in App

भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ सध्या चांगलीच चर्चेत आहे. इंस्टाग्रामवर शमीची पत्नी टिक टॉक व्हिडीओ पोस्ट करताना दिसत आहेत.  या व्हिडीओवर नेटिझन्स तिच्यावर टीका करताना पाहायला मिळत आहेत. पण, गुरुवारी तिचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्यातील तिच्या उमराव जान लूकनं नेटिझन्सनाही घायाळ केलं आहे.  या व्हिडीओत हसीन जहाँ उमराव जानच्या 'इन आंखो की मस्ती के' या गाण्यावर अदाकारी सादर करताना दिसत आहे.   

हसीन जहाँच्या इंस्टाग्रामवरील व्हिडीओवर अनेकांनी टीका केली. हसीन जहाँला ट्रोल केले गेले. त्यावर तिनंही सडेतोड उत्तर दिले, परंतु सोमवारी तिनं सर्व मर्यादा ओलांडल्या. तिनं बिकनीवरील फोटोशूटचा व्हिडीओ पोस्ट करून ट्रोलर्सवर खालच्या थराची टीका केली. 

मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ एकत्र राहत नाही. हसीन जहाँनं भारतीय गोलंदाजावर बरेच गंभीर आरोप केले. त्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोप तिनं केले, शिवाय शमीचे कुटुंबीय छळ करत असल्याचा दावाही करत तिनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. शमीनं फिक्सिंगही केल्याचा आरोप तिनं केला होता आणि त्यानुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) चौकशी करून शमीला क्लिन चिट दिली. पण, हा वाद सध्या न्यायालयात गेला आहे.  

हरभजन सिंग मागतोय सचिन तेंडुलकरकडे लिंबू, Video पाहून तुम्हालाही कळेल कारण

Shocking : WWE सुपरस्टारचा बुडून दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवण्यासाठी केला त्याग!

वाईट बातमी; अजिंक्य रहाणेच्या मामांचा विहिरीत पडून मृत्यू

पाहा व्हिडीओ...

टॅग्स :मोहम्मद शामीसोशल व्हायरल