Join us

Video : बाबो; हॅल्मेट घालून न्यूझीलंडच्या खेळाडूची गोलंदाजी, पण का?

क्रिकेटमध्ये चेंडू लागून खेळाडू जखमी झाल्याच्या घटना अनेकदा घडल्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 15:54 IST

Open in App

क्रिकेटमध्ये चेंडू लागून खेळाडू जखमी झाल्याच्या घटना अनेकदा घडल्या. अशा प्रसंगांना तोंड देण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसह स्थानिक क्रिकेट संघटना वेळोवेळी योग्य उपाययोजना करत आहेत. त्यामुळे चेंडू लागून जखमी होण्याचे प्रमाण कमी झालेले पाहायला मिळत आहे. पण, उपाययोजना असूनही गोलंदाज चक्क हॅल्मेट घालून गोलंदाजीला आला तर... होय हे खरं आहे. न्यूझीलंडचा खेळाडू चक्क बेसबॉल खेळातील हॅल्मेट घालून मैदानावर उतरलेला पाहायला मिळाला. 

न्यूझीलंड संघाचा माजी अष्टपैलू अँण्ड्य्रू एलिस असे या गोलंदाजाचं नाव आहे. येथील स्थानिक क्रिकेट सामन्यांत तो गोलंदाजी करण्यासाठी आला, त्यावेळी त्याच्याकडे सर्व पाहातच राहिले. त्यानं चक्क हॅल्मेट घातलं होतं आणि तो तसाच गोलंदाजी करत होता. यामागे कारणही तसंच आहे. स्थानिक स्पर्धेतील मागील मोसमात गोलंदाजी करत असताना एलिसच्या डोक्यावर जोरात चेंडू आदळला होता आणि तसा धोका त्याला आता अजिबात पत्करायचा नव्हता. म्हणून तो हॅल्मेट घालून गोलंदाजीला आला.

कँटेर्बरी संघाचे प्रतिनिधित्व करणारा एलिस सेंट्रल स्टेज संघाविरुद्धच्या सामन्यात त्यानं स्वतःचं डोकं हॅल्मेटनं झाकलं होतं. 37 वर्षीय एलिसनं न्यूझीलंड संघाकडून 15 वन डे आणि 5 ट्वेंटी-20 सामने खेळला आहे. फेब्रुवारी 2018मध्ये ऑकलंडविरुद्धच्या सामन्यात जीत रावलनं टोलावलेला चेंडू एलिसच्या डोक्यावर आदळला. विशेषतः तो चेंडू सीमापार केला आणि एलिस गंभीर दुखापतीपासून वाचला. त्यानंतर त्यानं हॅल्मेट घालून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  

टॅग्स :न्यूझीलंड