Join us

Liam Livingstone Superman Catch, IPL 2022 CSK vs PBKS Live: सुपरमॅन कॅच! लियम लिव्हिंगस्टोनने हवेत उडी मारून टिपला ब्राव्होचा भन्नाट झेल, पाहा Video 

लिव्हिंगस्टोनला अष्टपैलू कामगिरीसाठी मिळाला सामनावीराचा किताब

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 23:59 IST

Open in App

Liam Livingstone Superman Catch, IPL 2022 CSK vs PBKS Live: पंजाबने रविवारच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा संघाचा ५४ धावांनी दणदणीत पराभव केला. लियम लिव्हिंगस्टोनचे अर्धशतक (६०) आणि शिखर धवन (३३), जितेश शर्मा (२६) यांच्या खेळीच्या बळावर पंजाब किंग्जने १८० धावा केल्या होत्या. चेन्नई सुपर किंग्जला १८१ धावांचे मोठे आव्हान पेलवलं नाही. त्यांना केवळ १२६ धावाच करता आल्या. सामन्यात लियम लिव्हिंगस्टोनच्या फलंदाजीची चर्चा झालीच, पण त्यासोबतच गोलंदाजी आणि फिल्डिंगचीही चांगलीच चर्चा रंगली.

चेन्नईच्या डावाची सुरूवात अतिशय खराब झाली. ऋतुराज गायकवाड (१), रॉबिन उथप्पा (९), मोईन अली (०), रविंद्र जाडेजा (०) आणि अंबाती रायुडू (१३) हे पाच जण लगेच माघारी परतले. त्यामुळे चेन्नईची अवस्था ५ बाद ३६ झाली होती. त्यानंतर शिवम दुबेने दमदार अर्धशतक झळकावलं. त्याला लिव्हिंगस्टोनने ५७ धावांवर माघारी धाडलं. त्यानंतर धोनीची साथ देण्यासाठी धडाकेबाज फलंदाज ड्वेन ब्राव्हो आला. तो कशी फलंदाजी करणार यावर साऱ्यांच्याच नजरा असताना पहिल्याच चेंडूवर लिव्हिंगस्टोनने त्याचा स्वत:च्याच गोलंदाजीवर अप्रतिम झेल टिपला. हवेत उडी मारून त्याने ब्राव्होचा सुपरमॅन कॅच घेतला.

त्यानंतर इतर फलंदाजही झटपट माघारी परतले. चेन्नईची शेवटची आशा असलेला महेंद्रसिंग धोनी १७व्या षटकात २३ धावा काढून बाद झाला. त्यानंतर चेन्नईचा डाव १२६ धावांवर आटोपला आणि पंजाबने सामना ५४ धावांनी जिंकला. लिव्हिंगस्टोनला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीराचा किताब देण्यात आला.

टॅग्स :आयपीएल २०२२पंजाब किंग्सचेन्नई सुपर किंग्समहेंद्रसिंग धोनी
Open in App