Join us

VIDEO : ऑफ स्पिनर झाला लसिथ मलिंगा, घेतल्या तीन विकेट

श्रीलंका क्रिकेट टीम सध्या पाकिस्तान दौ-यावर आहे. या संघात वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाला जागा मिळालेली नाही. मलिंगाला त्याच्या यॉर्कर बॉलसाठी ओळखलं जातं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 19:40 IST

Open in App

श्रीलंका क्रिकेट टीम सध्या पाकिस्तान दौ-यावर आहे. या संघात वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाला जागा मिळालेली नाही. मलिंगाला त्याच्या यॉर्कर बॉलसाठी ओळखलं जातं. मात्र, नुकत्याच श्रीलंकेत झालेल्या एका स्थानिक सामन्यात 34 वर्षिय मलिंगा चक्क ऑफ स्पिन गोलंदाजी करताना दिसला. त्याने केवळ फिरकी गोलंदाजीच केली नाही तर त्याने सामन्यात 3 विकेट देखील घेतल्या. मलिंगाच्या या कामगिरीच्याच जोरावर तो नेतृत्व करत असलेल्या टिजय लंका संघाने 82 धावांनी विजय मिळवला. डकवर्थ लुईस नियमानुसार या सामन्याचा निकाल लागला. 

भारताच्या श्रीलंका दौऱ्यात लसिथ मलिंगाला फारशी चमक दाखवता आली नव्हती. या दौऱ्यात मलिंगाने वन-डे कारकिर्दीतला 300 बळींचा टप्पा पूर्ण केला. मात्र, यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी त्याची संघात निवड करण्यात आली नव्हती. गेल्या काही महिन्यांपासून मलिंगा फिटनेस आणि फॉर्मसोबत झगडत आहे. पूर्णपणे फिट होवून राष्ट्रीय संघात परतण्याच्या तो प्रयत्नात आहे. 

पाहा व्हिडीओ- 

 

 

 

टॅग्स :क्रिकेटलसिथ मलिंगा