Join us

Video: नववधू अथियासोबत रोमँटिक झाला केएल राहुल; कॅमेरासमोर केलं Kiss

क्रिकेटपटू केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी नुकतेच विवाह बंधनात अडकले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 09:37 IST

Open in App

क्रिकेटपटू केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी नुकतेच विवाह बंधनात अडकले. सध्या दोघंही आपलं वैवाहिक जीवन एन्जॉय करत आहेत. २३ जानेवारीला खंडाळ्यामध्ये दोघांचा शाही विवाह सोहळा संपन्न झाला. खंडाळ्यात सुनील शेट्टीच्या बंगल्यावर विवाहसोहळा झाला. या शाही लग्नाला बॉलिवूड आणि स्पोर्ट्स इंडस्ट्रीतील स्टार्स आणि कपलचे जवळचे मित्र उपस्थित होते.

केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांनी आता सोशल मीडियात लग्न सोहळ्याचे फोटो अपलोड केले आहेत. लग्न सोहळ्यातील संगीत असो किंवा मग हळद असो अथिया-राहुलच्या केमेस्ट्रीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. केएल राहुलनं लेडी लव्ह अथिया शेट्टीसोबतचा एक रोमँटिंग व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ लग्नानंतरच्या पार्टीमधला असून सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दोघांचा रोमँटिक अंदाज पाहून चाहतेही व्हिडिओवर भरभरुन कमेंट्स करत आहेत. 

टॅग्स :लोकेश राहुल
Open in App