Join us

Video : भारतात सापडला फिरकीपटू रशीद खानची हुबेहुब नक्कल करणारा गोलंदाज

अफगाणिस्तानचा पोस्टर बॉय असलेल्या फिरकीपटू रशीद खानने अल्पावधीतच क्रिकेट वर्तुळात आपली छाप पाडली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 13:52 IST

Open in App
ठळक मुद्देअफगाणिस्तानचा पोस्टर बॉय असलेल्या फिरकीपटू रशीद खानने अल्पावधितच क्रिकेट वर्तुळात आपली छाप पाडली आहे. कॅलेंडर वर्षात त्याला विकेटचे शतक साजरे करण्याची संधी आहे

नवी दिल्ली : अफगाणिस्तानचा पोस्टर बॉय असलेल्या फिरकीपटू रशीद खानने अल्पावधीतच क्रिकेट वर्तुळात आपली छाप पाडली आहे. त्याच्यासाठी 2018 हे वर्ष व्यावसायिक ट्वेंटी-20 लीगच्या दृष्टीने सर्वात यशस्वी ठरले आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये तो सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व करतो आणि भारतातही त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. भारतातील अनेक युवा गोलंदाजांच्या तो आदर्शस्थानी आहे. त्यामुळेच त्याच्यासारखी गोलंदाजी करण्याचा अनेक युवक प्रयत्न करतात. 

चेन्नई सुपर किंग्जच्या दीपक चहरने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यात एक युवा गोलंदाज रशीद खानची हुबेहुब नक्कल करुन गोलंदाजी करताना दिसत आहे.  पाहा व्हिडीओ..  ट्वेंटी-20 लीगमध्ये रशीद हा हुकुमी एक्का बनला आहे. तो सध्या ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीगमध्ये अॅडलेड स्ट्रायकर्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्याने तेथेही प्रभावी कामगिरी करताना पहिल्या दोन सामन्यांत अनुक्रमे 3/19 आणि 2/13 अशा विकेट घेतल्या. रशीदला एक आगळावेगळा विक्रम खुणावत आहे. कॅलेंडर वर्षात त्याला ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये विकेटचे शतक साजरे करण्याची संधी आहे. त्याने ड्वेन ब्राव्होच्या 87 धावांचा विक्रम मोडला आहे आणि त्याच्या नावावर सध्या 94 विकेट्स आहेत.    

टॅग्स :सनरायझर्स हैदराबादआयपीएल