Join us  

India vs West Indies : पहिल्या ट्वेंटी-20 पूर्वीच टीम इंडियाच्या खेळाडूंची पळापळ, पाहा Video

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या ट्वेंटी-20 मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2019 10:16 AM

Open in App

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या ट्वेंटी-20 मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. हैदराबाद येथे होणाऱ्या या सामन्यावर पावसाचं सावट असलं तरी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी कसून सराव केला. हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाची चांगलीच पळापळ झाल्याची पाहायला मिळाली. टीम इंडियाच्या प्रशिक्षकांनी खेळाडूंकडून नव्या प्रकारचा सराव करून घेतला. 

टीम इंडियात तंदुरुस्तीला खूप महत्त्व असल्याचं मागील काही वर्षांत दिसून आले आहेत. त्यामुळेच संघात स्थान पटकावण्यासाठी यो-यो चाचणी पास करावीच लागते. त्याचाच एक भाग म्हणून टीम इंडियाच्या व्यवस्थापनानं खेळाडूंकडून चांगलाच सराव करून घेतला. यात खेळाडूंना लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी नवीन प्रकारचा सराव करावा लागला. आता काय आहे हा सराव हे तुम्हीच पाहा...

पाहा व्हिडीओ...

भारतीय संघानं बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत 2-0 असे निर्भेळ यश मिळवले, तर ट्वेंटी-20 मालिकेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 2-1 असा विजय नोंदवला.   

  • भारतीय संघ ट्वेंटी-20 - विराट कोहली, युजवेंद्र चहल, दीपक चहर, शिवम दुबे, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, मनीष पांडे, रिषभ पंत, लोकेश राहुल, संजू सॅमसन, रोहित शर्मा, वॉशिंग्टन सुंदर.
  • भारताय संघ वन डे - विराट कोहली, रोहित शर्मा, युजवेंद्र चहल, दीपक चहर, शिखर धवन, शिवम दुबे, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, केदार जाधव, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, मनीष पांडे, रिषभ पंत, लोकेश राहुल
  • वेस्ट इंडिजचा वन डे संघः सुनील अ‍ॅब्रीस, शे होप, खॅरी पिएर, रोस्टन चेस, अल्झारी जोसेफ, किरॉन पोलार्ड ( कर्णधार), शेल्डन कोट्रेल, ब्रँडन किंग, निकोलस पूरण, शिम्रोन हेटमायर, एव्हिन लुईस, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, किमो पॉल, हेडन वॉल्श ज्युनियर. 
  • वेस्ट इंडिजचा ट्वेंटी-20 संघः फॅबियन अ‍ॅलेन, ब्रँडन किंग, डेनेस रामदिन, शेल्डन कोट्रेल, एव्हिन लुईस, शेरफान रुथरफोर्ड, शिमरोन हेटमायर, खॅरी पिएर, लेंडल सिमन्स, जेसन होल्डर, किरॉन पोलार्ड ( कर्णधार, हेडन वॉल्श ज्युनियर, किमो पॉल, निकोलस पूरण, केस्रीक विलियम्स, 

विंडीज मालिकेचे वेळापत्रक⦁    ट्वेंटी-20 मालिका6 डिसेंबर - हैदराबाद8 डिसेंबर - तिरुवनंतपुरम11 डिसेंबर - मुंबई ⦁    वन डे मालिका15 डिसेंबर- चेन्नई18 डिसेंबर- विशाखापट्टणम22 डिसेंबर - कट्टक

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजभारतीय क्रिकेट संघबीसीसीआयविराट कोहलीरोहित शर्मा