भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातला दुसरा ट्वेंटी-20 सामना एकतर्फी झाला. यजमान टीम इंडियानं 7 विकेट आणि 15 चेंडू राखून हा सामना जिंकला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतील. श्रीलंकेनं विजयासाठी ठेवलेलं 143 धावांच आव्हान टीम इंडियानं सहज पार केलं. टीम इंडियानं 2020 सालाची विजयानं सुरुवात केली. कर्णधार विराट कोहलीनं या सामन्यात मारलेला विजयी षटकार चाहत्यांच्या पसंतीत उतरला. कोहलीनं खास 'नटराज' मुद्रा घेत लाहिरू कुमारानं टाकलेला चेंडू प्रेक्षकांमध्ये पाठवला आणि टीम इंडियाचा विजय निश्चित केला. सामन्यानंतर कोहलीच्या या नटराज मुद्रेचीच सोशल मीडियावर हवा पाहायला मिळाली.
प्रथम फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेनं 9 बाद 142 धावा केल्या. या सामन्यातून कमबॅक करणाऱ्या जसप्रीत बुमराहवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. मात्र, शार्दूल ठाकूर आणि नवदीप सैनी हे स्टार ठरले. शार्दूलनं 23 धावांत 3, तर सैनीनं 18 धावांत 2 विकेट्स घेतल्या. सैनीनं 147.5च्या गतीनं यॉर्कर टाकून दनुष्का गुणथिलकाचा ( 20) त्रिफळा उडवला. लंकेकडून अविष्का फर्नांडो ( 22) आणि कुसल परेरा ( 34) यांनी साजेसा खेळ केला. कुलदीप यादवनेही दोन विकेट घेतल्या.
पाहा व्हिडीओ...
पाहा व्हिडीओ...
नेटिझन्स सुसाट...