IND vs SL, 2nd T20I : विराट कोहलीच्या 'नटराज' स्टाईलचा धुरळा; षटकार खेचून जिंकला सामना; Video

भारत विरुद्ध श्रीलंकाः 'नटराज' मुद्रा घेत लाहिरू कुमारानं टाकलेला चेंडू प्रेक्षकांमध्ये पाठवला अन्

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 09:07 IST2020-01-08T09:06:21+5:302020-01-08T09:07:16+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Video: India vs Sri Lanka, 2nd T20I : Virat Kohli hitting ‘Nataraja’ six to finish Indore T20I in style | IND vs SL, 2nd T20I : विराट कोहलीच्या 'नटराज' स्टाईलचा धुरळा; षटकार खेचून जिंकला सामना; Video

IND vs SL, 2nd T20I : विराट कोहलीच्या 'नटराज' स्टाईलचा धुरळा; षटकार खेचून जिंकला सामना; Video

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातला दुसरा ट्वेंटी-20 सामना एकतर्फी झाला. यजमान टीम इंडियानं 7 विकेट आणि 15 चेंडू राखून हा सामना जिंकला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतील. श्रीलंकेनं विजयासाठी ठेवलेलं 143 धावांच आव्हान टीम इंडियानं सहज पार केलं. टीम इंडियानं 2020 सालाची विजयानं सुरुवात केली. कर्णधार विराट कोहलीनं या सामन्यात मारलेला विजयी षटकार चाहत्यांच्या पसंतीत उतरला. कोहलीनं खास 'नटराज' मुद्रा घेत लाहिरू कुमारानं टाकलेला चेंडू प्रेक्षकांमध्ये पाठवला आणि टीम इंडियाचा विजय निश्चित केला. सामन्यानंतर कोहलीच्या या नटराज मुद्रेचीच सोशल मीडियावर हवा पाहायला मिळाली.

प्रथम फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेनं 9 बाद 142 धावा केल्या. या सामन्यातून कमबॅक करणाऱ्या जसप्रीत बुमराहवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. मात्र, शार्दूल ठाकूर आणि नवदीप सैनी हे स्टार ठरले. शार्दूलनं 23 धावांत 3, तर सैनीनं 18 धावांत 2 विकेट्स घेतल्या. सैनीनं 147.5च्या गतीनं यॉर्कर टाकून दनुष्का गुणथिलकाचा ( 20) त्रिफळा उडवला.  लंकेकडून अविष्का फर्नांडो ( 22) आणि कुसल परेरा ( 34) यांनी साजेसा खेळ केला. कुलदीप यादवनेही दोन विकेट घेतल्या.

पाहा व्हिडीओ...

लक्ष्याचा पाठलाग करताना पुनरागमन करणाऱ्या शिखर धवननं सलामीवीर लोकेश राहुलला तोडीसतोड साथ दिली.  या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली. राहुल 32 चेंडूंत 6 चौकाराच्या मदतीनं 45 धावा करून माघारी परतला. त्यानंतर धवनही 29 चेंडूंत 32 धावांवर बाद झाला. श्रेयस अय्यरने 26 चेंडूंत 34 धावा केल्या. कर्णधार विराट कोहलीनं 17 चेंडूंत 1 चौकार व 2 षटकार खेचून नाबाद 30 धावा केल्या. विराटनं विजयी धाव खणखणीत षटकार मारून घेतली. त्याच्या या षटकारानं सोशल मीडियावर धुरळा केला.

पाहा व्हिडीओ...

नेटिझन्स सुसाट...

 

Web Title: Video: India vs Sri Lanka, 2nd T20I : Virat Kohli hitting ‘Nataraja’ six to finish Indore T20I in style