Join us

Video: 'चॉकलेट परत दे...'; चाहत्याला ऑटोग्राफ दिल्यानंतर धोनीने परत मागितले चॉकलेट...

MS Dhoni: महेंद्रसिंह धोनी सध्या अमेरिकेत सुट्ट्या एन्जॉय करतोय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 20:08 IST

Open in App

MS Dhoni Fun Interaction With A Fan: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे भारतासह जगभरात चाहते आहेत. सध्या धोनी कुटुंबासह अमेरिकेत सुट्ट्या एन्जॉय करतोय. नुकताच धोनीचा माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत गोल्फ खेळतानाचा फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर आता धोनीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात तो एका व्यक्तीकडून चॉकलेट परत मागताना दिसतोय.

अमेरिकेत धोनीला एक चाहता भेटला, यावेळी त्या चाहत्याने धोनीला ऑटोग्राफ मागितला. धोनीने चाहत्याच्या छोट्या बॅटवर ऑटोग्राफ दिला. यानंतर धोनीने त्या व्यक्तीच्या हातात असलेला चॉकलेटचा बॉक्स परत मागितला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

यापूर्वी, धोनी 2023 च्या यूएस ओपनमध्ये कार्लोस अल्काराज आणि झ्वेरेव यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीचा सामना पाहण्यासाठी आला होता. तो व्हिडिओही व्हायरल झाला. 2020 मध्ये धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, तेव्हापासून धोनी आपले खासगी आयुष्य आनंदाने घालवतोय. 

आगामी आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यता2024 मध्ये होणाऱ्या आयपीएलच्या 17 व्या हंगामात धोनी पुन्हा चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करताना दिसेल अशी आशा सर्व चाहत्यांना आहे. गुडघ्याच्या ऑपरेशननंतर धोनी पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे, त्यामुळे तो लवकरच पुढील हंगामात खेळण्याबाबत निर्णय घेऊ शकतो.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीअमेरिकाऑफ द फिल्डसोशल व्हायरल