मुंबई : भारताचा जलदगती गोलंदाज जस्प्रीत बुमरा त्याच्या अनोख्या शैलीने ओळखला जातो. त्याच्या गोलंदाजीत विविधता ही भल्याभल्या फलंदाजांना बुचकळ्यात टाकणारी आहे. त्यामुळेच त्याचे जगभरात चाहते आहेत. यात पाकिस्तानच्या पाच वर्षीय फॅन्सचीही भर पडलेली आहे. पण, हा फॅन जरा हटके आहे... तो बुमराच्या गोलंदाची हुबेहुब नकल मारत आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.
पाहा हा व्हिडीओ...
बुमराला वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या दोन वन डे सामन्यांतून विश्रांती देण्यात आली आहे.