Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video : महेंद्रसिंग धोनीची कन्या झिवाने दिल्या फिटनेस टिप्स... चार लाखांहून अधिक व्ह्यू

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची लोकप्रियता जगभरात कायम आहे. वडीलांप्रमाणे मुलगी झिवाही सोशल मीडियावर फेमस आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 08:52 IST

Open in App

रांची : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची लोकप्रियता जगभरात कायम आहे. वडीलांप्रमाणे मुलगी झिवाही सोशल मीडियावर फेमस आहे. त्यामुळेच या चिमुकलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होतात. धोनीची पत्नी साक्षीने झिवाचा एक व्हिडीओ इस्टाग्रामवर पोस्ट केला आणि त्याला अल्पावधीत चार लाखांहून अधिक व्ह्यू मिळाले आहेत. या व्हिडीओत झिवा व्यायामाचा सर्वात कठीण प्रकार करताना दिसत आहे. 

तीन वर्षांची झिवा ज्या प्रकारे प्लँक करत आहे, ते पाहून भल्याभल्यांना थक्क केले आहे. साक्षीनेही झिवा तिच्यापेक्षा उत्तम प्लँक करत असल्याचे मत व्यक्त केले आहे.  झिवाच्या या व्हिडीओला चार लाखांहून अधिक व्ह्यू मिळाले आहेत. त्याशिवाय 1 लाखांहून अधिकांनी लाईक्सही दिले आहेत.

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीजीवा धोनी