Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाप रे बाप, इंग्लंडच्या सराव सत्रात शिरला साप!

Video : इंग्लंडचा क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. इंग्लंडचा संघ येथे 5 वन डे, 3 कसोटी आणि 1 ट्वेंटी-20 सामना खेळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 09:32 IST

Open in App

कोलंबो : इंग्लंडचा क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. इंग्लंडचा संघ येथे 5 वन डे, 3 कसोटी आणि 1 ट्वेंटी-20 सामना खेळणार आहे. वन डे मालिकेत इंग्लंडने 1-0 अशी आघाडी घेतली असून तिसरा सामना बुधवारी खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ कसून सराव करत आहेत. पण, मंगळवारी इंग्लंडच्या सराव सत्रात अनोळखी पाहुणा दिसला अन् सर्वांची तारांबळ उडाली.

इंग्लंडच्या सराव सत्रात चक्क कोब्रा साप दिसल्याने पळापळ सुरू झाली. इंग्लंडने या पाहुण्याचा व्हिडीओ त्यांच्या अधिकृत ट्विटरवर पोस्ट केला आहे आणि सराव सत्रात पाहुण्याची भेट.. अशी कॅप्शनही दिली आहे. 12 सेकंदाच्या या व्हिडीओत कर्मचारी त्या सापाला एका पाईपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. बाकीचे सर्व त्याचे चित्रण करण्यात मग्न आहेत. डम्बुल्ला येथे आयोजित पहिला वन डे सामना पावसामुळे रद्द झाला, तर दुसऱ्या वन डेत इंग्लंडन्र 31 धावांनी ( डकवर्थ लुईस प्रणाली) विजय मिळवला. 

टॅग्स :इंग्लंडश्रीलंका