Join us  

Video: सामना सुरु असताना मैदानात घुसली महिला; खेळाडूंचा हातात घेतला हात अन्...

सेंच्युरियन मैदानात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या ट्वेंटी- 20 सामना लाईव्ह सुरु असताना एक महिला थेट मैदानात घुसली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 12:08 PM

Open in App

इंग्लंडने दक्षिण अफ्रिकेविरुद्धची ट्वेंटी- 20 मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली होती. पहिला ट्वेंटी- 20  सामना यजमान दक्षिण आफ्रिकेने जिंकला होता, दुसरा सामना इंग्लंडने जिंकला होता. त्यामुळे तिसरा ट्वेंटी- 20 सामना निर्णायक होता. मात्र या निर्णायक सामन्यात दक्षिण अफ्रिकेवर विजय मिळवत इंल्डंने मालिका खिशात घातली होती. मात्र तिसरा ट्वेंटी- 20 सामन्यात एक विचित्र प्रकार घडल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

सेंच्युरियन मैदानात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या ट्वेंटी- 20 सामना लाईव्ह सुरु असताना एक महिला थेट मैदानात घुसली होती. त्यानंतर तिने दक्षिण अफ्रिकेचा विकेटकीपर क्विंटन डी कॉकला मास्क दिले. यानंतर दक्षिण अफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन त्या महिलेजवळ आल्यानंतर त्याला देखील त्या महिलेने मास्क दिले आणि ते घालण्यास सांगितले. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या तिसरा आणि निर्णायक सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर दक्षिण अफ्रिकेचा फलंदाज हेनरिक क्लिसेन 66, टेम्बा बावुमा 49, डेव्हिड मिलर- क्विंटन डी कॉकने केलेल्या 35-35 धावांच्या जोरावर दक्षिण अफ्रिकेने 223 धावांचा डोंगर इंग्लंडपुढे ठेवला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या 3 फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली. यात जोस बटलर 57, जॉनी बेअरस्टो 64, इयन मॉर्गन 57 यांनी शानदार खेळी केली आणि 5 चेंडू शिल्लक असताना इंग्लंड संघाने आव्हानात्मक लक्ष्य गाठले आणि 5 गडी राखून शानदार विजय मिळविला होता.

टॅग्स :क्विन्टन डि कॉकद. आफ्रिकाइंग्लंडसोशल व्हायरलसोशल मीडिया