Join us  

व्हिडिओ - 37 वर्षांचा झाला धोनी, 'झिवाच्या साक्षीने माही'चा बर्थ डे..

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आपला 37 वा जन्मदिवस साजरा केला. पत्नी साक्षी आणि मुलगी झिवासह आपल्या संघातील सहकाऱ्यांसोबत धोनीने केक कापून जन्मदिवस साजरा केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2018 12:35 PM

Open in App

मुंबई - टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आपला 37 वा जन्मदिवस साजरा केला. पत्नी साक्षी आणि मुलगी झिवासह आपल्या संघातील सहकाऱ्यांसोबत धोनीने केक कापून जन्मदिवस साजरा केला. धोनीच्या या बर्थ डे सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. धोनीच्या चाहत्यांकडून हा व्हिडिओ आणि धोनीचे छायाचित्र शेअर करुन माहीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार आणि अष्टपैलू क्रिकेटर महेंद्रसिंह धोनी आज 37 वर्षांचा झाला आहे. धोनीने आपल्या कुटुंबासह आणि संघातील खेळाडूंसह केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी मुलगी झिवाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज सुरेश रैनाने धोनीच्या बर्थ डेचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत.

रांचीतील एका गरीब कुटुंबातून पुढे आलेल्या माहीने आपल्या क्रिकेट खेळाच्या जोरावर जगभरातील कोट्यवधी चाहत्यांची मने जिंकली आहे. भारताला विश्वचषक, टी-20 विश्वचषक, चॅम्पीयन ट्रॉफी जिंकून देण्याचा विक्रम कर्णधार धोनीच्या नावे आहे. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरनंतर सर्वाधिक प्रेम मिळालेला धोनी हा एकमेव खेळाडू आहे. प्रतिकूल परिस्थितीत संघाला विजय मिळवून देण्याची कामगिरी धोनीने अनेकवेळा बजावली आहे. त्यामुळे धोनी चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला आहे.

बीसीसीआयकडूनही धोनीला शुभेच्छा...

स्मार्ट कर्णधार, उत्कृष्ट यष्टीरक्षक, शेवटच्या चेंडूवर षटकार, मॅच फिनीशर, हेलिकॉप्टर शॉट, फास्ट रनिंग बिटवीन द विकेट आणि विजयी षटकार ठोकणार धोनी अशी कित्येक बिरुदावली धोनीच्या नावावर जमा झाली आहेत. भारतीय क्रिकेटचा काळ धोनीच्या कारकिर्दीतच उजाडला. धोनीच्या नेतृत्वात कोट्यवधी भारतीयांनी क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटला. म्हणूनच कोट्यवधी चाहत्यांकडून धोनीवर आज शुभेच्छांचे चौकार आणि षटकार पडत आहे. दरम्यान, टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर असल्याने धोनीचा जन्मदिवसही इंग्लंडमध्येच साजरा करण्यात आला आहे. 

धडाकेबाज विरेंद्र सेहवागकडूनही माहीला हटके शुभेच्छा...

 

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीक्रिकेटभारतीय क्रिकेट संघसुरेश रैना