ठळक मुद्देरिषभ पंतने सांगितले इनोव्हेटिव्ह शॉट्सचे रहस्यमनिष पांडे अखेरच्या षटकात होता तणावातसंजय बांगरने दिला चहलला सल्ला
चेन्नई : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज ट्वेंटी-20 मालिकेत यजमान भारताने निर्भेळ यश मिळवले. अखेरच्या सामन्यात भारताला विजयासाठी कडवी झुंज द्यावी लागली. शिखर धवन आणि रिषभ पंत बाद झाल्यामुळे भारतासाठी सोपा वाटणारा विजय अवघड झाला, परंतु भारताने अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला. या विजयानंतर हॉटेलमध्ये परत जाताना टीम बसमध्ये युजवेंद्र चहलने भारतीय खेळाडूंची फिरकी घेतली. त्याने 'चहल चॅनेल'वर भारतीय खेळाडूंना बोलतं केलं.
बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओत चहल भारतीय खेळाडूंना मालिका विजयाबद्दल प्रश्न विचारत आहे. त्याने या मुलाखतीची सुरुवात कर्णधार रोहित शर्माकडून केली. त्यानंतर त्याने मोर्चा रिषभ पंतकडे वळवला आणि त्याला इनोव्हेटिव्ह शॉट्सबाबत छेडले. या नव्या शॉट्सवर पंत त्रिफळाचित झाला होता. त्यावर पंतनेही गमतीदार उत्तर दिले. चहलने
शिखर धवन, मनीष पांडे आणि संजय बांगर यांचीही फिरकी घेतली. मात्र, बांगरने चहलला त्याच्याच जाळ्यात अडकवत मोलाचा सल्ला दिला.
संपूर्ण मुलाखतीसाठी पाहा व्हिडीओ... http://www.bcci.tv/videos/id/7090/bus-tales-with-yuzvendra-chahal