Join us  

Video : इंग्लंडच्या खेळाडूची कमाल; 16 चेंडूंत अर्धशतक अन् एका षटकात सलग पाच षटकार

बिग बॅश लीगमध्ये तुफान फटकेबाजी पाहायला मिळत आहे. सोमवारीही इंग्लंडच्या टॉम बँटन याच्या दमदार खेळीनं क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन केले. ...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2020 5:36 PM

Open in App

बिग बॅश लीगमध्ये तुफान फटकेबाजी पाहायला मिळत आहे. सोमवारीही इंग्लंडच्या टॉम बँटन याच्या दमदार खेळीनं क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन केले. ब्रिस्बन हिट संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बँटननं सिडनी थंडर्सच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. पावसानं बाधीत झालेला हा सामना 8-8 षटकांचा खेळवण्यात आला आणि त्याता ब्रिस्बन हिट संघानं डकवर्थ लुईस प्रणालीनुसार 16 धावांनी विजय मिळवला.

प्रथम फलंदाजीला आलेल्या ब्रिस्बन हिटकडून बँटन आणि ख्रिस लीन यांनी डावाची सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी पाच षटकांत 90 धावांची तुफानी भागीदारी केली. लीन 13 चेंडूंत  3 चौकार व 2 षटकार खेचून 31 धावांत माघारी परतला. त्यानंतर हिटच्या डावाला गळती लागली. पण, बँटन एका बाजूने फटकेबाजी करत होता. त्यानं 16 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याची ही खेळी 56 धावांवर संपुष्टात आली. या खेळीत त्यानं एकाच षटकात पाच षटकार खेचण्याचाही पराक्रम केला. बँटननं 19 चेंडूंत 2 चौकार व 7 षटकार खेचले. बँटनच्या फटकेबाजीच्या जोरावर हिटनं 4 बाद 119 धावा केल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना सिडनी थंडर्सला 5 षटकांत 4 बाद 60 धावा करता आल्या. पुन्हा पावसाची एन्ट्री झाल्यानं डकवर्थ लुईस नियमानुसार ब्रिस्बन हिटनं हा सामना 16 धावांनी जिंकला. 

पाहा व्हिडीओ...

टॅग्स :टी-20 क्रिकेटइंग्लंड