VIDEO: भरमैदानात बाचाबाची... ट्रिस्टन स्टब्सला दिली 'खुन्नस', प्रिन्स यादवने नेमकं काय केलं?

Tristan Stubbs vs Prince Yadav, IPL 2026 Video: सामन्यात एक हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 10:24 IST2026-04-02T10:23:56+5:302026-04-02T10:24:42+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
VIDEO brawl broke out in the stadium Tristan Stubbs was given stares what exactly did Prince Yadav do? | VIDEO: भरमैदानात बाचाबाची... ट्रिस्टन स्टब्सला दिली 'खुन्नस', प्रिन्स यादवने नेमकं काय केलं?

VIDEO: भरमैदानात बाचाबाची... ट्रिस्टन स्टब्सला दिली 'खुन्नस', प्रिन्स यादवने नेमकं काय केलं?

Tristan Stubbs vs Prince Yadav, IPL 2026 Video: नव्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सला दमदार फलंदाजीच्या जोरावर पराभूत केले. लखनौने प्रथम फलंदाजी करताना १४१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने १७ चेंडू राखून विजय मिळवला. या सामन्यात एक हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.

नेमकं काय घडलं?

पाचव्या षटकातील चौथ्या चेंडूवर ट्रिस्टन स्टब्सने प्रिंस यादवला एक जबरदस्त 'पुल शॉट' मारून स्क्वेअर लेगला चौकार मारला. या चौकारामुळे प्रिंस यादव काहीसा संतप्त झाला होता. पुढचा चेंडू प्रिंसने लेंथ बॉल टाकला, जो स्टब्सने सन्मानाने डिफेंड केला. मात्र, चेंडू टाकल्यानंतर प्रिंस तसाच पुढे गेला आणि त्याने स्टब्सच्या डोळ्यात डोळे घालून त्याला रागाने पाहिले. स्टब्सनेही मागे न हटता प्रिंसला उत्तर दिले. दोघांमध्ये काही काळ खुन्नस दिसून आली. त्यानंतर काही सेकंद दोघांमध्ये शाब्दिक चकमकही झाली. ही घटना घडली तेव्हा पंचांनी मध्यस्थी केली नाही.

प्रिंस यादवची दमदार कामगिरी

जरी या चकमकीमुळे प्रिंस चर्चेत आला असला, तरी त्याच षटकात त्याने भेदक गोलंदाजी केली. त्याने त्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर पदार्पण करणाऱ्या पथुम निसंकाला बाद केले आणि तिसऱ्या चेंडूवर दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलला शून्यावर बाद करून मोठा धक्का दिला. या सामन्यात दिल्लीचा माजी कर्णधार ऋषभ पंतने सलामीला येण्याचा निर्णय घेतला होता, मात्र तो केवळ ७ धावा करून धावबाद झाला. तो चांगल्या लयीत होता, पण नॉनस्ट्राईक वर असताना तो बाद झाला.

Web Title : आईपीएल में भिड़ंत: स्टब्स और यादव मैदान पर टकराए!

Web Summary : दिल्ली कैपिटल्स ने लखनऊ को हराया। बाउंड्री के बाद ट्रिस्टन स्टब्स और प्रिंस यादव के बीच तीखी बहस हुई। यादव ने एक ही ओवर में पदार्पण करने वाले और कप्तान पटेल सहित दो बल्लेबाजों को आउट किया। पंत 7 रन पर रन आउट हुए।

Web Title : IPL Face-Off: Stubbs and Yadav Clash on the Field!

Web Summary : Delhi Capitals defeated Lucknow. A heated exchange occurred between Tristan Stubbs and Prince Yadav after a boundary. Yadav dismissed two batsmen in the same over, including a debutant and captain Patel. Pant was run out for 7.