Video : पाकिस्तानच्या फलंदाजाचा पोपट! 'हा' रनआऊट पाहून हसू आवरणार नाही

Video: पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी हास्यास्पद प्रकार घडला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 14:23 IST2018-10-18T14:09:50+5:302018-10-18T14:23:07+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Video: Azhar Ali gets run-out in the most comical fashion of Pakistan vs Australia 2nd Test | Video : पाकिस्तानच्या फलंदाजाचा पोपट! 'हा' रनआऊट पाहून हसू आवरणार नाही

Video : पाकिस्तानच्या फलंदाजाचा पोपट! 'हा' रनआऊट पाहून हसू आवरणार नाही

दुबई : पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी हास्यास्पद प्रकार घडला. पाकिस्तानचा फलंदाज अझर अलीचा पाहुण्या ऑस्ट्रेलियाने पोपट केला. सोशल मीडियावरही या प्रकाराचीच चर्चा रंगली होती. पाकिस्तानच्या पहिल्या डावातील 282 धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ 145 धावांवर माघारी फिरला. दुसऱ्या डावात फखर जमान (66) आणि अझर अली ( 64) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्तानने चारशे धावांची आघाडी घेतली.

अझर अलीचा खेळ पाहून तो शतक झळकावेल असे वाटत असताना मैदानावर एक किस्सा घडला आणि कोणालाही हसू आवरता आले नाही. पीटर सिडलच्या गोलंदाजीवर अझरने टोलावलेला चेंडू थर्ड मॅनच्या इथून सीमारेषेच्या दिशेने गेला. चौकार गेल्याचे समजून अझर खेळपट्टीच्या मध्यभागी येऊन असाद शफिकसोबत चर्चा करत उभा राहिला. मात्र, सीमारेषेच्या काही सेंटीमीटर दूर थांबला. मिचेल स्टार्कने तो  चेंडू यष्टिरक्षक टिम पेनकडे थ्रो केला. काही कळण्याआधीच पेनने अझरला धावबाद केले. 

अझर अशा प्रकारे बाद झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 
 




पाहा असेच काही Funny रनआऊट



 

Web Title: Video: Azhar Ali gets run-out in the most comical fashion of Pakistan vs Australia 2nd Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.