Vidarbha Are The Winners Of The Vijay Hazare Trophy 2025-26 देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील सर्वात प्रतिष्ठित विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा फायनल खेळताना विदर्भ संघाने अखेर पहिल्यांदा या स्पर्धेच जेतेपद पटकावले आहे. सलामीवीर अथर्व तायडेची दमदार शतक आणि यश राठोडनं केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर पहिल्यांदा फलंदाजी करताना विदर्भ संघाने निर्धारित ५० षटकात ८ विकेट्सच्या मोबदल्यात ३१७ धावा करत सौराष्ट्र संघासमोर ३१८ धावांचे टार्गेट सेट केले होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
या धावांचा पाठलाग करताना सौराष्ट्र संघांची सुरुवात खराब झाली. कर्णधार हार्विक देसाईच्या रुपात ३० धावावर नचिकेत भूते याने सौराष्ट्र संघाला पहिला धक्का दिला. त्याच्या पाठोपाठ सेमीफायनलमधील शतकवीर विश्वराज जडेजा ९ धावांवर तंबूत परतला. यश ठाकूरनं संघाला ही महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिली. दर्शन नलकांडेनं आपल्या गोलंदाजीतील चमक दाखवत सम्मार गज्जर याला माघारी धाडत सौराष्ट्र संघाला धक्क्यावर धक्के दिले. सौराष्ट्र संघाकडून परेक मंकड ८८ (९२) आणि चिराग जैन ६४ (६३) यांनी अर्धशतक झळकावले. पण त्यांची ही खेळी सौराष्ट्र संघाला विजयी डाव साधण्यासाठी उपयुक्त ठरली नाही. विदर्भ संघाकडून फलंदाजीवेळी अथर्व तायडेला उत्तम साथ देणाऱ्या यश राठोडनं चार विकेट्सचा डाव साध संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
Atharva Taide Century : IPL मध्ये अनसोल्डचा ठपका; अकोल्याच्या पोट्याची फायनलमध्ये कडक सेंच्युरी
विजय हजारे ट्रॉफी विजेते (२००२ पासून)
- २००२-०३ – तामिळनाडू
- २००३-०४ – मुंबई
- २००४-०५ – तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश (संयुक्त विजेते)
- २००५-०६ – रेल्वे
- २००६-०७ – मुंबई
- २००७-०८ – सौराष्ट्र
- २००८-०९ – तामिळनाडू
- २००९-१० – तामिळनाडू
- २०१०-११ – झारखंड
- २०११-१२ – बंगाल
- २०१२-१३ – दिल्ली
- २०१३-१४ – कर्नाटक
- २०१४-१५ – कर्नाटक
- २०१५-१६ – गुजरात
- २०१६-१७ – तामिळनाडू
- २०१७-१८ – कर्नाटक
- २०१८-१९ – मुंबई
- २०१९-२० – कर्नाटक
- २०२०-२१ – मुंबई
- २०२१-२२ – हिमाचल प्रदेश
- २०२२-२३ – सौराष्ट्र
- २०२३-२४ – हरियाणा
- २०२४-२५ – कर्नाटका
- २०२५-२६ – विदर्भ
Web Summary : Vidarbha clinched their first Vijay Hazare Trophy, defeating Saurashtra. Atharva Taide's century and Yash Rathod's fifty set a target of 318. Rathod also took four wickets, sealing Vidarbha's historic victory after Saurashtra's chase faltered.
Web Summary : विदर्भ ने सौराष्ट्र को हराकर पहली बार विजय हजारे ट्रॉफी जीती। अथर्व तायडे के शतक और यश राठौड़ के अर्धशतक ने 318 का लक्ष्य रखा। राठौड़ ने चार विकेट भी लिए, जिससे सौराष्ट्र का पीछा विफल होने के बाद विदर्भ की ऐतिहासिक जीत सुनिश्चित हो गई।