Join us

Veraan at AVas! विराट कोहलीचं अलिबागमधील हॉलिडे होम तयार; घडवली सफर 

भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे अलिबाग येथील स्वप्नांतील घर तयार झालं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 13:43 IST

Open in App

भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे अलिबाग येथील स्वप्नांतील घर तयार झालं आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर केप टाऊन कसोटीत ऐतिहासिक विजय मिळवून विराट मायदेशात परतला... सोबत पत्नी अनुष्काही आली. या दोघांनी अलिबाग येथे जागा खरेदी केली होती आणि त्यावर आलिशान बंगला साकारला जात होता. आता हे काम पूर्ण झाले आहे आणि विराटच्या फॅन पेजवरून या बंगल्याचा व्हिडीओ पोस्ट केला गेला आहे.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा नेहमीच आलिशान आयुष्य जगतात. त्यांच्या फोटोंमधून हे नेहमीच दिसून येते. अलिबाग मध्येही त्यांचा एक आलिशान बंगला आहे. हा बंगला कोणत्याही स्वप्नातल्या बंगल्यापेक्षा कमी नाही. कोहली आणि अनुष्काच्या या अलिबाग येथील बंगल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. एव्हास वेलनेस यांनी घराची रचना केली आहे. पूर्ण घर हे व्हाईट बेसवर बनले आहे आणि Veraan at AVas! असे या घरावर नावफलक दिसत आहे. यातील AV याचा अर्थ अनुष्का विराट असा लावला जात आहे.

घरातील डायनिंग एरिआ तर खुपच स्पेशियस आहे. काचेचे दरवाजे असलेला हा भाग गार्डनला लागून आहे. आलिशान लिव्हिंग रुम आहे. व्हाईट आणि ग्रीन थिम वर घराचे स्ट्रक्चर दिसून येते. हवेशीर पण तितकेच प्रायव्हेट हे घर आहे. घराची रचना हवेशीर, आकर्षक आणि खूपच खास आहे. या घराचे डिझाईन हृतिक रोशनची पहिली पत्नी सुझैन खान ने केले असल्याचे बोलले जात आहे. 

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्माऑफ द फिल्ड