Join us
Daily Top 2Weekly Top 5

व्यंकटेश प्रसाद किंग्स पंजाबचे गोलंदाजी कोच

व्यंकटेश प्रसाद यांनी आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाब संघाच्या गोलंदाजी कोचपदाची जबाबदारी स्वीकारली. दोन दिवसांआधी भारताच्या ज्युनियर राष्ट्रीय निवड समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणारे प्रसाद यांनी रविवारी नवे पद स्वीकारले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 02:12 IST

Open in App

मोहाली - व्यंकटेश प्रसाद यांनी आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाब संघाच्या गोलंदाजी कोचपदाची जबाबदारी स्वीकारली. दोन दिवसांआधी भारताच्या ज्युनियर राष्ट्रीय निवड समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणारे प्रसाद यांनी रविवारी नवे पद स्वीकारले. आयपीएलचे ११ वे सत्र ७ एप्रिलपासून सुरू होत आहे.किंग्स पंजाबच्या व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघाचे माजी गोलंदाज व्यंकटेश प्रसाद हे संघाचे गोलंदाजी कोच असतील. आॅस्ट्रेलियाचे माजी खेळाडू ब्रॅड हॉज हे पुढील तीन सत्रांसाठी संघाचे मुख्य कोच राहतील. टी-२० त सात हजारांवर धावाकाढणा-या हॉज यांनी वीरेंद्र सेहवागसारख्या मेंटरच्या मार्गदर्शनात संघ यशस्वी होईल. आमच्या कोचिंग स्टाफमधील प्रत्येक सदस्य अनुभवी असून, चांगली कामगिरी होण्यास उपयुक्त योगदान देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.दिल्लीचा माजी खेळाडू मिथुन मन्हास सहायक कोच राहील. निशांत ठाकूर तयारी कोच, श्यामल वल्लभजी तांत्रिक कोच आणि निशांत बोर्डोलाय क्षेत्ररक्षण कोच असतील. सेहवाग म्हणाला,‘यंदा व्यंकटेशसोबतच विदेशी कोचची संघाला सेवामिळेल, याबद्दल आशावादी आहो. संघाला अनुभवाचा लाभ होणार आहे.’ (वृत्तसंस्था)

टॅग्स :क्रिकेटभारत