IPL 2026 Auction Venkatesh Iyer Sold To Royal Challengers Bengaluru : आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावाआधी महागड्या खेळाडूला नारळ दिल्यावर कोलकाता नाईट रायडर्सनं भाव पाडून त्याला पुन्हा संघात घेण्याचा डाव खेळला. पण त्यांचा हा प्रयत्न विराट कोहलीच्या RCB संघामुळे अपयशी ठरला. २ कोटींच्या मूळ किंमतीसह लिलावात सामील झालेल्या व्यंकटेश अय्यरसाठी त्याचा जुना संघ कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात चांगलीच चढाओढ पाहायला मिळाली. पण यात शेवटी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने बाजी मारली. ७ कोटींसह त्यांनी भारतीय अष्टपैलू खेळाडूला आपल्या संघात सामील करून घेतले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
KKR नं जोर लावला, पण शेवटी RCB नं मारली बाजी
KKR नं फलंदाजी आणि गोलंदाजीत उपयुक्त असलेल्या व्यंकटेश अय्यरसाठी मेगा लिलावात २३.७५ कोटी एवढी मोठी रक्कम मोजली होती. पण तो लौकीकाला साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरला. त्याला रिलीज करत कमी किंमतीत पुन्हा संघात घेण्याचा डाव KKR च्या संघाने खेळला. पण RCB च्या संघाने कोट्यवधीची यशस्वी बोली लावत अष्टपैलू खेळाडूला आपल्या संघात घेतले.
IPL 2026 Auction : कॅमरुन ग्रीनसह BCCI ही मालामाल! ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लागली रेकॉर्ड ब्रेकिंग बोली
भाव कमी झाला, पण नवा संघ मिळाला! तोही विराटचा
IPL च्या गत हंगामात मोठी किंमत मिळाल्यावरही तो चांगली कामगिरी करू शकला नव्हता. पण आगामी आयपीएलआधी देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो धमाकेदार कामगिरी करताना दिसून आले. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत मध्य प्रदेश संघाकडून त्याने दमदार फलंदाजी करून दाखवली आहे. IPL मध्ये आतापर्यंत KKR च्या संघाकडून खेळताना दिसलेला व्यंकटेश अय्यर आता RCB च्या ताफ्यातून खेळताना दिसेल. आतापर्यंत ६२ सामन्यात त्याने IPL मध्ये १४६७ धावा केल्या आहेत. गत हंगामात २३.७५ कोटींच्या तुलनेत व्यंकटेश अय्यरला मोठा घाटा झाला आहे. पण विराट कोहलीच्या संघाकडून खेळण्याची मिळालेली संधी त्याच्यासाठी मोलाचीच ठरेल.