नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात आघाडीवर असलेल्या विदर्भ क्रिकेट संघटनेने आपल्या घटनेत आवश्यक दुरुस्ती केली आहे. घटनादुरुस्तीला शनिवारी झालेल्या आमसभेने मंजुरी प्रदान केली. संशोधित संविधानानुसार व्हीसीएची नवी कार्यकारिणी आगामी ३० डिसेंबर रोजी निवडणुकीद्वारे निवडण्यात येणार आहे. सिव्हिल लाईन्स येथील बिलिमोरिया सभागृहात झालेल्या ८४ व्या आमसभेत हा निर्णय घेण्यात आला.