Varun Chakravarthy Trump Card For Team India : वरुण चक्रवर्ती 'नाम तो सुना होगा...' दुबईच्या मैदानात त्याच कामही पाहिलं असेल. हा तोच चेहरा आहे ज्याला शाहरुखच्या केकेआरच्या ताफ्यातून तुम्ही आयपीएलमध्ये आपल्या फिरकीतील मॅजिक दाखवताना पाहिलं आहे. आयपीएलमधील कामगिरीमुळे त्यानं टीम इंडियात एन्ट्री मारली. २०२१ मध्ये युएईच्या मैदानात रंगलेल्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली. या स्पर्धेत तीन मॅचेस खेळला. पण विकेट लेस राहिल्यावर ३ वर्षे तो टीम इंडियाबाहेर फेकला गेला. आज त्याच्या युएईतील दुबईच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात या भाऊन कहर करून दाखवला. पण त्याचा इथपर्यंतचा प्रवास सहज सोपा नव्हता. तीन वर्षांनी कमबॅक केल्यावर या पठ्ठ्यानं गठ्ठ्यानं विकेट घेण्याचा पॅटर्न सेट करुन शेवटच्या क्षणी दुबईच तिकीट मिळवलं. आता मैदानही गाजवलं.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
३ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा उघडले टीम इंडियाचे दरवाजे, अन् ...
२०२१ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर तो दुर्लक्षित झाला. गतवर्षी म्हणजे २०२४ च्या हंगामात बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेत त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे पुन्हा उघडले. ही संधी मिळताच त्याने गठ्यानं विकेट्स मिळवण्याचा आपला शो सुरु केला. त्याने प्रत्येक मॅचमध्ये आपली जादू दाखवून देत टी-२० संघातून आता कुणी बाहेर काढणार नाही, अशी कामगिरी करून दाखवली. एवढेच नाही तर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेत त्याने पाहुण्या संघातील फलंदाजांना सामन्यात त्याने गुडघे टेकायला लाववले. सातत्यपूर्ण दमदार कामगिरी पाहून आयत्या वेळी आधी त्याची इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियात एन्ट्री झाली. अन् मग त्याला दुबईचं तिकीटही मिळाले.
अखेरच्या क्षणी मिळालं दुबईचं तिकीट; सेमी आधी रोहित-ंगंभीरनं बाहेर काढला हुकमी एक्का
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी आधी जो संघ निवडण्यात आला होता त्यात वरुण चक्रवर्तीचा समावेश नव्हता. पण फायनल यादीत त्याला स्थान मिळाले अन् तो दुबईला जाणार ते पक्के झाले. टीम इंडियात आधीच फिरकीचा भरणा असताना त्याच्यावर डाव खेळण्यात आला. दुबईचं तिकीच मिळाल्यावर पहिल्या दोन सामन्यात त्याला बाकावर बसावे लागले. त्यामुळे तो फक्त बाकावर बसूनच ही स्पर्धा बघणार का? असा प्रश्नही निर्माण झाला होता. पण न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा आणि कोच गौतम गंभीरनं झाकून ठेवलेला हुकमी एक्का बाहेर काढला. त्यानंही आपल्या फिरकीतील जादू दाखवून मै देत बचाव करण्यासाठी अवघड वाटत असलेल्या सामन्यात 'मैं हूं ना' शो! दाखवत किवी फलंदाजीतील जीव काढला.
हा फक्त ट्रेलर होता, पिक्चर अजून बाकी...
न्यूझीलंड विरुद्धच्या अव्वलस्थानाच्या लढतीत अर्धा संघ गारद करून त्याने सेमीच्या लढतीत प्लेइंग इलेव्हनमधील आपली जागा पक्की केलीये. खरंतर टीम इंडियाचा हा एक मोठा प्लानच होता, असे दिसतंय. वरुण चक्रवर्तीचं चक्रव्यूह भेदणं सोपी गोष्ट नाही. टी-२० क्रिकेटमध्ये त्याने गठ्यानं विकेट्स काढत आपल्या गोलंदाजीतील मॅजिक दाखवलं. पण टी-२० च्या तुलनेत वनडेत गठ्यानं विकेट घेण्याचा डाव साधणं सोपी गोष्ट नाही. कारण या फॉर्मेटमध्ये फलंदाजाला वेळ घेण्याची संधी मिळते. यात तो प्रतिस्पर्धी गोलंदाजाचा डाव हाणून पाडू शकतो. पण किवींचा जीव घेत वरुण चक्रवर्तीनं आपलं चक्रव्यूह भेदणं सहज सोप नाही त्याची झलक दाखवून दिलीये. भारतीय संघ आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमी फायनल खेळणार आहे. या सामन्यातही फिरकी हेच भारतीय संघाच ब्रह्मास्त्र असेल. अन् त्यात वरुण चक्रवर्तीचा रोल महत्त्वाचा असेल. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात जे दिसलं तो फक्त ट्रेलर होता अन् पिक्चर अजून बाकी आहे, हा शो दाखवून वरुण चक्रवर्ती टीम इंडियासाठी ट्रम्प कार्ड ठरेल, असेच दिसते.