राजस्थान रॉयल्सचा यंदाच्या आयपीएलमध्ये दर तीन चेंडूंमागे एक सिक्सर मारणारा धडाडीचा फलंदाज वैभव सूर्यवंशीला 'सुपर स्ट्रायकर ऑफ द सीजन' पुरस्कार मिळाला आहे. यामुळे त्याला टाटाची कर्व्ह ही कार बक्षीस मिळाली आहे. ही कार जरी वैभवला मिळाली असली तरी तो ती पुढील काही वर्षे चालवू शकणार नाहीय.
यंदाची आयपीएल वैभवने गाजवली. गुजरात टायटन्सविरुद्ध ३८ चेंडूत १०१ धावांची खेळी करत त्याने आयपीएलमधील सर्वात जलद शतक नोंदविले. तसेच तो आयपीएलमध्ये शतक ठोकणारा सर्वात तरुणही खेळाडू ठरला आहे. त्याने सर्वात जलद शतक ठोकण्याचा युसुफ पठाणचा विक्रमही मोडला आहे.
आयपीएलच्या नियमांमुळे वैभव यंदाच्या आयपीएलमध्ये केवळ सात सामनेच खेळू शकला. परंतू, या सात सामन्यात त्याने 206.55 च्या स्ट्राईक रेटने 252 रन काढले. यात एक शतक, एक अर्धशतक आहे. या कामगिरीमुळे त्याला टाटा कर्व्ह कार देण्यात आली आहे. वैभवचे वय १४ वर्षे आहे, यामुळे तो पुढील चार वर्षे म्हणजेच १८ वर्षांचा होईपर्यंत हा कार चालवू शकणार नाहीय.
भारतात १८ वर्षांचा झाल्यावर ड्रायव्हिंग लायसन काढता येते. यामुळे कार मिळाली तरी त्याला ती चालविण्यासाठी ४ वर्षे वाट पहावी लागणार आहे. वैभवचे आता अंडर-19 टीममध्येही सिलेक्शन झाले आहे. आयपीएलनंतर तो इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. वैभवची ३० लाखांच्या मूळ किमतीवरून बोली सुरु झाली होती. अनेक संघांनी त्याला संघात घेण्यासाठी प्रयत्न केला. अखेर राजस्थान रॉयल्स संघाची बोली यशस्वी ठरली. IPL इतिहासातील सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरलेल्या वैभव सूर्यवंशीचे राजस्थानने १ कोटी १० लाखांची बोली लावली होती.
Web Title: Vaibhav Suryavanshi won the lottery! He got a Tata Curve in IPL 2025, but... he won't be able to drive it
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.