भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीचा तुफानी फॉर्म ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही कायम आहे. वनडेमध्ये धमाकेदार कामगिरी केल्यानंतर आता त्याने यूथ टेस्टमध्येही आपली प्रतिभा सिद्ध केली. ब्रिस्बेन येथील इयान हीली ओव्हलवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या यूथ टेस्ट मॅचमध्ये त्याने आक्रमक खेळी करत एक शानदार शतक झळकावले. या कामगिरीसह त्याच्या नावावर अनेक विक्रम नोंदवण्यात आले.
ऑस्ट्रेलियाचा दौरा युवा फलंदाजांसाठी नेहमीच कठीण मानला जातो, पण वैभव सूर्यवंशीने हा दौरा अगदी सोपा करून दाखवला. इंडिया अंडर-१९ टीमकडून खेळताना त्याने बुधवारी केवळ ८६ चेंडूंमध्ये ११३ धावांची स्फोटक खेळी केली. हेडन सिलरच्या गोलंदाजीवर तो बाद झाला असला तरी, पॅव्हेलियनमध्ये परतण्यापूर्वी त्याने ८ चौकार आणि ७ षटकार मारत कांगारू गोलंदाजाच्या नाकी नऊ आणले.
सर्वात जलद शतक
वैभव सूर्यवंशीच्या या खेळीमुळे एक मोठा विक्रम मोडला गेला. त्याने केलेले ७८ चेंडूंमधील शतक हे युथ टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या भूमीवरचे सर्वात जलद शतक ठरले. या शतकामुळे त्याने आणखी एक खास विक्रम आपल्या नावावर केला. १०० पेक्षा कमी चेंडूंमध्ये दोन युथ टेस्ट शतक झळकावणारा तो न्यूझीलंडचा महान फलंदाज ब्रेंडन मॅक्युलम याच्यानंतरचा पहिला खेळाडू बनला आहे. यापूर्वी २०२४ मध्ये त्याने ऑस्ट्रेलिया अंडर-१९ विरुद्ध ५८ चेंडूंमध्ये शतक ठोकले.
सर्वाधिक षटकारांचा विक्रम
युथ टेस्टमध्ये भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही वैभवने आता पहिला क्रमांक मिळवला. त्याने आपल्या शानदार खेळीत ८ षटकार मारून कॅप्टन आयुष म्हात्रेचा जुना विक्रम मोडला. वैभवच्या नावावर आता युथ टेस्टमध्ये एकूण १५ षटकारांची नोंद झाली.
सर्वात कमी वयाचा खेळाडू
वयाच्या १४व्या वर्षी अशी कामगिरी करणारा तो जगातील सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला आहे. याच वर्षाच्या सुरुवातीला त्याने आयपीएलमध्ये ३५ चेंडूंमध्ये शतक झळकावले.
Web Summary : Young Indian batsman Vaibhav Suryavanshi continued his impressive form, smashing a century against Australia in the Youth Test. His aggressive innings included eight fours and seven sixes, breaking records for fastest century and most sixes.
Web Summary : युवा भारतीय बल्लेबाज वैभव सूर्यवंशी ने यूथ टेस्ट में ऑस्ट्रेलिया के खिलाफ शानदार शतक बनाया। उनकी आक्रामक पारी में आठ चौके और सात छक्के शामिल थे, जिससे सबसे तेज शतक और सबसे ज्यादा छक्कों के रिकॉर्ड टूट गए।