Join us

IPL 2025 गाजवून बिहारच्या घरी परतला वैभव सूर्यवंशी; साऱ्यांनी केलं धमाकेदार स्वागत (Video)

Vaibhav Suryavanshi Grand Welcome in Bihar: स्पर्धेत दमदार कामगिरी केल्यानंतर वैभवला टीम इंडियामध्ये मिळाली संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 14:13 IST

Open in App

Vaibhav Suryavanshi Grand Welcome in Bihar: बिहारमधील १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने IPL 2025 मध्ये धमाकेदार फलंदाजी करून साऱ्यांचे लक्ष वेधले. सर्वात तरुण खेळाडू म्हणून राजस्थान रॉयल्सकडून त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले. संधी मिळताच वैभवने तुफानी फलंदाजी करून दाखवली. आयपीएलमध्ये त्याने केलेल्या फटकेबाजीचे सर्वत्र कौतुक झाले. स्पर्धेनंतर वैभव सूर्यवंशी बिहारमध्ये त्याच्या घरी परतला. आयपीएलमधील यशानंतर वैभवचे त्याच्या घरी भव्य स्वागत करण्यात आले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'वैभव-वैभव'चा जयघोष, दमदार सेलिब्रेशन

राजस्थान रॉयल्सने वैभव सूर्यवंशीला १ कोटी १० लाख रुपयांना खरेदी केले होते. राजस्थान संघ अतिशय वाईट पद्धतीने प्लेऑफमधून बाहेर पडला. पण या हंगामात भारतीय क्रिकेटला वैभवच्या रूपात एक धडाकेबाज खेळाडू मिळाला. बिहारच्या वैभवने पदार्पणाच्या आयपीएलमध्येच साऱ्यांना अवाक् केले. राजस्थानचा संघ संघर्ष करत असतानाही वैभवने संपूर्ण हंगामात चांगली कामगिरी केली. त्यानंतर तो त्याच्या मूळ गावी ताजपूर (समस्तीपूर, बिहार) येथे परतला. तिथे त्याचे स्वागत हार घालून आणि केक कापून करण्यात आले. 'घरात स्वागत आहे बॉस बेबी वैभव' असे केकवर लिहिले होते. यावेळी घरात वैभव-वैभव नावाचा जयघोष घुमला. संपूर्ण कुटुंब आणि आजूबाजूचे लोक या आनंदोत्सवात सहभागी झाले.

चमकदार कामगिरीनंतर भारतीय संघात निवड

IPL 2025च्या काही सामन्यांनंतर वैभव सूर्यवंशीला लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याने यंदाच्या हंगामात ७ सामने खेळले आणि ३६च्या सरासरीने २५२ धावा केल्या. या काळात त्याचा स्ट्राइक रेट २०६ एवढा होता. त्याच्या तिसऱ्या सामन्यात वैभवने ३५ चेंडूत धमाकेदार शतकही झळकावले. त्याच्या याच दमदार खेळीच्या जोरावर त्याची भारताच्या १९ वर्षांखालील संघात निवड झाली आहे. हा संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५व्हायरल व्हिडिओराजस्थान रॉयल्सबिहार