Vaibhav Suryavanshi: IPL 2025 मध्ये सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर वैभव सूर्यवंशी. त्याने आपल्या फटकेबाज खेळीच्या जोरावर कमी वेळात भरपूर नाव कमावले. अवघ्या १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला भारताच्या अंडर-१९ संघातर्फे इंग्लंड दौऱ्याचीही संधी मिळाली. भारताचा १९ वर्षांखालील संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. २७ जूनपासून या संघाची मालिका सुरू होणार आहे. त्यात वैभव सूर्यवंशीदेखील खेळताना दिसणार आहे. या मालिकेआधीच त्याला वजन वाढण्याची चिंता सतावतेय आणि फिटनेस राखण्यासाठी त्याने खास निर्णय घेतलाय.
वैभव डाएट फॉलो करतोय- संजीव सूर्यवंशी
वैभव सूर्यवंशीला नेहमीच चिकन आणि मटण खाण्याची आवड आहे. त्याशिवाय त्याला लिट्टी-चोखा देखील खूप आवडतो. लिट्टी-चोखा हा बिहारमधील जवळजवळ प्रत्येक व्यक्तीचा आवडता पदार्थ आहे. पण वडील संजीव सूर्यवंशी यांनी सांगितले की, वैभव सूर्यवंशीने आता लिट्टी-चोखा खाणे बंद करून टाकले आहे. वैभवच्या वडिलांनी दैनिक जागरणला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
वैभवचा डाएट प्लॅन
संजीव सूर्यवंशी म्हणाले की, वैभव सूर्यवंशीचा आहार आता खूप संतुलित झाला आहे. तो आता संतुलित आहार घेतो, ज्यामध्ये लिट्टी-चोख्याला स्थान नाही. वैभवच्या वडिलांनी या संतुलित आहार योजनेमागील कारणही सांगितले. त्यांनी सांगितले की, वैभवला वजन वाढण्याचा धोका आहे. अशा परिस्थितीत वजय नियंत्रणात ठेवण्यासाठी तो नव्या डाएट प्लॅनप्रमाणे जेवतो.
बॅटवर लिहिलंय वैभवचं नाव
इंग्लंड विरूद्धच्या मालिकेआधी वैभव सूर्यवंशीला ३ नवीन बॅट्स मिळाल्या आहेत. या बॅट्समध्ये एक वेगळीच खास बात आहे. वैभव सूर्यवंशीला मिळालेल्या तीन बॅटची स्वतःची एक खासियत आहे. या तिन्ही बॅटवर वैभवचे नाव लिहिलेले आहे. वैभव पहिल्यांदाच इंग्लंडच्या भूमीवर खेळणार आहे.
Web Title: Vaibhav Suryavanshi is suffering from fitness tension New plan to control increasing weight
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.