मुंबई: भारताचा युवा फलंदाज आणि 'वंडर बॉय' म्हणून ओळखला जाणारा वैभव सूर्यवंशी याची कमाई सुरु झाली आहे. आरोग्य आणि वेलनेस कंपनी 'झायडस वेलनेस'ने आपल्या लोकप्रिय हेल्थ ड्रिंक ब्रँड 'कॉम्प्लान'साठी वैभव सूर्यवंशीची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे.
वैभव सूर्यवंशीने वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी भारतीय अंडर-१९ संघात स्थान मिळवून आणि नुकत्याच झालेल्या आयपीएल लिलावात सर्वात तरुण खेळाडू ठरून क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले होते. आता मैदानावरील कामगिरीसोबतच तो जाहिरात क्षेत्रातही आपली छाप पाडणार आहे. 'कॉम्प्लान'ने आजवर अनेक दिग्गजांना ब्रँड फेस म्हणून संधी दिली आहे, त्या रांगेत आता वैभवचे नाव जोडले गेले आहे.
कंपनीच्या मते, वैभव सूर्यवंशी हा आजच्या पिढीतील खेळाडूंसाठी ऊर्जा, जिद्द आणि योग्य वाढीचे प्रतीक आहे. मुलांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या कॉम्प्लान ब्रँडच्या मूल्यांशी वैभवचे व्यक्तिमत्व तंतोतंत जुळते. या भागीदारीच्या माध्यमातून कंपनी आपला ब्रँड संदेश तरुण पिढीपर्यंत आणि पालकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणार आहे.
ब्रँड व्हॅल्यूमध्ये वाढवैभव सूर्यवंशीने कमी वयात मिळवलेली प्रसिद्धी आणि त्याची मैदानावरील आक्रमक खेळी यामुळे त्याची 'मार्केट व्हॅल्यू' वेगाने वाढत आहे. कॉम्प्लॅनसोबतच्या या करारामुळे त्याला एक मोठी व्यावसायिक ओळख मिळाली आहे, जी त्याच्या आगामी क्रिकेट कारकिर्दीसाठी पूरक ठरेल.
Web Summary : Young cricketer Vaibhav Suryavanshi, known as 'Wonder Boy,' is now Complan's brand ambassador. Zydus Wellness chose him, recognizing his energy and appeal to youth, aiming to connect with a younger generation and their parents through this partnership. This deal boosts his market value.
Web Summary : युवा क्रिकेटर वैभव सूर्यवंशी, जो 'वंडर बॉय' के नाम से जाने जाते हैं, अब कॉम्प्लान के ब्रांड एंबेसडर हैं। ज़ायडस वेलनेस ने उन्हें चुना, उनकी ऊर्जा और युवाओं के प्रति आकर्षण को देखते हुए, इस साझेदारी के माध्यम से युवा पीढ़ी और उनके माता-पिता से जुड़ने का लक्ष्य है। इस डील से उनकी मार्केट वैल्यू बढ़ी है।