U19 World Cup 2026: न्यूझीलंडविरुद्ध वैभव सूर्यवंशीला खुणावतोय 'हा' विक्रम; गिलला मागे टाकण्याची संधी

इथं जाणून घेऊयात त्याला खुणावत असलेल्या खास विक्रमासंदर्भातील सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 19:27 IST2026-01-23T19:25:59+5:302026-01-23T19:27:06+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Vaibhav Suryavanshi Eyes On Shubman Gill Highest Run Scorer Record For India In Youth Odis ICC Under 19 World Cup 2026 IND U19 vs NZ U 19 | U19 World Cup 2026: न्यूझीलंडविरुद्ध वैभव सूर्यवंशीला खुणावतोय 'हा' विक्रम; गिलला मागे टाकण्याची संधी

U19 World Cup 2026: न्यूझीलंडविरुद्ध वैभव सूर्यवंशीला खुणावतोय 'हा' विक्रम; गिलला मागे टाकण्याची संधी

Vaibhav Suryavanshi Eyes On Shubman Gill Record : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या मोहिमेवर आहे. या स्पर्धेतील सलग दोन सामन्यातील लढतीनंतर साखळी फेरीतील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात भारतीय संघ न्यूझीलंडच्या १९ वर्षांखालील संघाला भिडणार आहे. शनिवारी रंगणाऱ्या या सामन्यात भारताचा १४ वर्षीय स्फोटक बॅटर वैभव सूर्यवंशीवर सर्वांच्या नजरा असतील. या सामन्यात तो एका डावात गिलसह सरफराज खान या स्टार क्रिकेटपटूंना  मागे टाकू शकते.  इथं जाणून घेऊयात त्याला खुणावत असलेल्या खास विक्रमासंदर्भातील सविस्तर

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

वैभव सूर्यवंशीला खुणावतोय हा विक्रम, गिलसह सरफराज मागे पडणार? 

U19 विश्वचषक स्पर्धेतील भारत-न्यूझीलंड यांच्यातील सामना बुलावेयो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यात वैभव सूर्यवंशीला यूथ वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत शुभमन गिल आणि सरफराज खान या  स्टार क्रिकेटर्संना मागे टाकण्याचा डाव साधण्याची संधी असेल.  

T20 World Cup 2026: बांगलादेश टी-२० विश्वचषकात सहभागी न झाल्यास भारताचे किती नुकसान होईल?

यूथ वनडेमधील सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत वैभव सूर्यवंशी हा सध्याच्या घडीला सहाव्या स्थानावर आहे.  न्यूझीलंडविरुद्ध ३१ धावा करताच तो सरफराज खानला मागे टाकत वैभव टॉप ५ मध्ये एन्ट्री मारेल. शतकी डाव साधताच तो गिलला मागे टाकेल. 

यूथ वनडेमधील सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज

  • यूथ वनडेमधील सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज
  • विजय झोल - १४०४ धावा
  • यशस्वी जैस्वाल -१३८६ धावा
  • तन्मय श्रीवास्तव- १३१६ धावा
  • शुभमन गिल / उन्मुक्त चंद - ११४९ धावा
  • सरफराज खान -  १०८० धावा
  • वैभव सूर्यवंशी - १०५० धावा
     

यंदाच्या स्पर्धेतील वैभव सूर्यवंशीची कामगिरी

विराट कोहली - ९७८ धावाअमेरिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशी ४ चेंडूत फक्त २ धावा करून बाद झाला होता. पण या सामन्यात त्याने सर्वात कमी वयात अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याचा खास विक्रम आपल्या नावे केला. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याने ६७ चेंडूत ७२ धावांची खेळी केली होती. तिसऱ्या सामन्यात शतकी खेळीसह तो एका डावात गिलसह तिघांना मागे टाकणार का? ते पाहण्याजोगे असेल.


 

Web Title : U19 विश्व कप: न्यूजीलैंड के खिलाफ गिल का रिकॉर्ड तोड़ सकते हैं सूर्यवंशी।

Web Summary : वैभव सूर्यवंशी का लक्ष्य न्यूजीलैंड के खिलाफ U19 विश्व कप मैच में शुभमन गिल के रिकॉर्ड को पार करना है। वर्तमान में युवा वनडे में भारतीय बल्लेबाजों में छठे स्थान पर, सूर्यवंशी को शीर्ष 5 में प्रवेश करने के लिए 31 रनों की आवश्यकता है और गिल को पछाड़ने के लिए एक शतक की आवश्यकता है। सबकी निगाहें उनके प्रदर्शन पर हैं।

Web Title : U19 World Cup: Suryavanshi eyes Gill's record in New Zealand clash.

Web Summary : Vaibhav Suryavanshi aims to surpass Shubman Gill's record in the U19 World Cup match against New Zealand. Currently sixth among Indian batsmen in youth ODIs, Suryavanshi needs 31 runs to enter the top 5 and a century to overtake Gill. All eyes are on his performance.