Join us

वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे इंग्लंडला जाणार! विराट-रोहितच्या कसोटी निवृत्तीनंतर BCCIची मोठी घोषणा

Vaibhav Suryavanshi Ayush Mhatre, Ind vs Eng Test: BCCI ने इंग्लंड दौऱ्यासाठी १६ खेळाडूंच्या नावाची यादी केली जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 14:03 IST

Open in App

Vaibhav Suryavanshi Ayush Mhatre, Ind vs Eng Test: राजस्थान रॉयल्स संघाचा १४ वर्षांचा नवखा सलामीवीर वैभव सूर्यवंशी इंग्लंड दौऱ्यावर जाणार हे निश्चित झाले आहे. BCCIने १६ सदस्यीय संघात त्याचा समावेश जाहीर केला आहे. तिथे तो जून आणि जुलै महिन्यात खेळल्या जाणाऱ्या इंग्लंड संघाविरुद्धच्या मालिकेत खेळणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत अशी मोठी नावे खेळताना दिसणार आहेत. याचदरम्यान, वैभव सूर्यवंशीबद्दलही बातमी आली आहे. तोही इंग्लंडला जाणार आहे. बीसीसीआयच्या ज्युनियर निवड समितीने टीम इंडियाच्या अंडर-१९ संघाची (U19 Cricket Team) घोषणा केली आहे. त्यासाठी वैभव सूर्यवंशीसह मराठमोळ्या आयुष म्हात्रेचीही निवड करण्यात आली आहे.

भारताच्या १९ वर्षांखालील संघाचा इंग्लंड दौरा २४ जूनपासून सुरू होणार आहे. हा दौरा २३ जुलैपर्यंत चालेल. या काळात, इंग्लंडच्या १९ वर्षांखालील संघासोबत ५० षटकांचा सराव सामना खेळण्याव्यतिरिक्त, भारताचा १९ वर्षांखालील संघ ५ एकदिवसीय आणि २ बहु-दिवसीय सामन्यांची मालिका देखील खेळेल.

भारताचा अंडर-१९ संघ: आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा, मौल्यराजसिंह चावडा, राहुल कुमार, अभिज्ञान कुंडू (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), हरवंश सिंग (यष्टीरक्षक), आरएस अंबरिश, कनिष्क चौहान, खिलान पटेल, हेनिल पटेल, युधजित गुहा, प्रणव राघवेंद्र, मोहम्मद एनान, आदित्य राणा, अनमोलजीत सिंग

राखीव खेळाडू: नमन पुष्पक, डी दीपेश, वेदांत त्रिवेदी, विकल्प तिवारी, अलंक्रित रापोले (यष्टीरक्षक)

 

 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५भारताचा इंग्लंड दौरा २०२५