Vaibhav Suryavanshi Viral Video : IPL स्पर्धेत आपल्या स्फोटक फटकेबाजीचा नजराणा पेश केल्यावर वैभव सूर्यंवशीनं इंग्लंडच्या मैदानातही मैफिल लुटली. चेंडू टप्प्यात सापडला की, तो जणू त्यावर तुटूनच पडतो. १४ वर्षांच्या पोराच्या फटकेबाजीतील ताकदीनं जगाला आश्चर्यचकित करून सोडलंय. प्रतिस्पर्धी गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या या पोरानं आता कॅमेरामनची पळताभुई थोडी केल्याची घटना घडली. वैभव सूर्यंवशीनं नेटमध्ये फटकेबाजी करताना गोळीच्या वेगानं मारलेला फटक्यापासून वाचण्यासाठी कॅमेरामन जीव मुठीत घेऊन पळताना दिसून आले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नेमकं काय घडलं?
गुरुवारी राजस्थान रॉयल्स संघाच्या एका प्रमोशनल व्हिडिओच्या शुटिंगसाठी वैभव सूर्यवंशी मैदानात उतरला होता. राजस्थान रॉयल्सच्या एक्स अकाउंटवरून या घटनेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत वैभव सूर्यवंशी हेल्मेटवर गोप्रो कॅमेरा लावून बॅटिंग करताना दिसते. नॉन स्ट्राइक एन्डला पाच क्रू सदस्य त्याचा व्हिडिओ शूट करण्यासाठी उभे होते. दरम्यान वैभववनं एक जोरदार फटका मारला. त्यानंतर कॅमेरामन स्वत:ला वाचवण्यासाठी धडपडताना दिसले. वैभव सूर्यवंशी हा जोरदार फटका मारल्यावर जे घडलं त्याबद्दल क्रू मेंबर्सची माफी मागतानाही व्हिडिओमध्ये दिसून येते.
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
नशीब चांगले; नाहीतर...
वैभव सूर्यवंशीनं मारलेला फटक्यानंतर चेंडू गोळीच्या वेगाने नॉन स्ट्राइक एन्डला गेला. जर हा चेंडू शूट करणाऱ्याला लागला असता तर त्याचं काही खरं नव्हते. पण सुदैवाने या नेटमध्ये कोणतीही दुर्देवी घटना घडली नाही. नशीब चांगले अन् तो कॅमेरामन वाचला.
वैभवचा IPL नंतर इंग्लंडमध्ये धमाका
आयपीएलमध्ये ३५ चेंडूत विक्रमी शतक झळकावल्यामुळे चर्चेत आलेल्या वैभव सूर्यवंशीनं १९ वर्षांखालील भारतीय संघातून इंग्लंड दौरा केला. इथंही त्याने आपल्या भात्यातील धमक दाखवली. इंग्लंडमधील यूथ वनडे स्पर्धेत वैभव सूर्यंवशीनं अंडर १९ मध्ये भारताकडून तिसऱ्या क्रमांकाचे जलद अर्धशतक झळकावले होते. एवढेच नाही तर चौथ्या वनडेत त्याने ५२ चेंडूत शतक साजरे करत वर्ल्ड रेकॉर्डही सेट केला होता.
Web Title: Vaibhav Suryavanshi Apologises After Nearly Injuring Camera Crew With a Blistering Shot Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.