Vaibhav Suryavanshi Video: वैभव सूर्यवंशी सध्या भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघांमधील आगामी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियामध्ये आहे. दोन्ही संघ प्रथम एकदिवसीय मालिका खेळतील आणि त्यानंतर दोन बहुदिवसीय सामने खेळले जातील. एकदिवसीय मालिका २१ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्यापूर्वी संघाचा स्फोटक डावखुरा फलंदाज वैभव सूर्यवंशीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो आकाशातून थेट मैदानावर उतरताना दिसतोय. जाणून घेऊया यामागची मजेदार गोष्ट.
वैभव सूर्यवंशीने स्वतः त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. वैभवची आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सने हा व्हिडीओ शेअर केला आहे. वैभव सूर्यवंशी सध्या ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनमध्ये आहे. याचदरम्यान, एक धमाल व्हिडीओ राजस्थानने शेअर केलाय. राजस्थान रॉयल्सने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये वैभव त्यांच्या आयपीएल जर्सीमध्ये दिसत आहे. या अँनिमेटेड व्हिडिओमध्ये वैभव सूर्यवंशी आकाशातून थेट मैदानावर उतरताना दाखवला आहे. एखाद्या अंतराळयानातून उतरल्यासारखा तो दिसतो. तो आधी बॉक्समधून बाहेर पडतो, मग रोबोट सारखा दिसतो, मग तो वैभव सूर्यवंशीच्या रूपात दिसतो आणि अखेरीस एक सुंदर हवाई फटका खेळतो. पाहा अँनिमेटेड व्हिडीओ-
वैभव सूर्यवंशीचा पहिला ऑस्ट्रेलिया दौरा
वैभव सूर्यवंशीचा हा ऑस्ट्रेलियाचा पहिलाच दौरा आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धची ही त्याची पहिलीच एकदिवसीय मालिका देखील असेल. वैभव सूर्यवंशीने अंडर-१९ संघांविरुद्ध एकूण आठ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यात त्याने एका शतकासह ५४च्या सरासरीने ४३२ धावा केल्या आहेत.