Vaibhav Suryvanshi in England: गिल, पंत, राहुल, यशस्वी या टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंनी इंग्लंडच्या भूमीवर आपली ताकद दाखवून दिली. पहिल्याच कसोटी सामन्यात या चौघांनीही दमदार शतके झळकावली. त्यापाठोपाठ आता इंग्लंडमध्ये १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचाही धमाका पाहायला मिळतोय. वैभव सूर्यवंशी भारताच्या अंडर १९ संघासोबत मालिका खेळण्यासाठी इंग्लंडला पोहोचला आहे. वैभव सूर्यवंशीला त्याचा चौथा सामना होव्ह मैदानावर खेळायचा आहे, जिथे टीम इंडियाने एकही सामना जिंकलेला नाही. पण त्याआधी वैभव सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून त्याने दमदार कामगिरी केली आहे.
वैभव सूर्यवंशीच्या ५ षटकारांसह ७७ धावा
भारताचा १९ वर्षांखालील संघ २७ जून रोजी इंग्लंडमधील होव्ह ग्राउंडवर पहिला सामना खेळणार आहे. वैभव सूर्यवंशीच्या १९ वर्षांखालील कारकिर्दीतील हा चौथा एकदिवसीय सामना असेल. यापूर्वी त्याने खेळलेल्या १९ वर्षांखालील ३ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने ५ षटकार आणि ९ चौकारांसह ७७ धावा केल्या आहेत. पहिल्या १९ वर्षांखालील ३ सामन्यांमध्ये वैभवच्या नावावर केवळ एकच अर्धशतक आहे. पण सध्याच्या इंग्लंड दौऱ्यावर तो नवे विक्रम प्रस्थापित करू शकतो.
इंग्लंड दौऱ्यासाठी खास तयारी
वैभव सूर्यवंशीला इंग्लंड दौऱ्यासाठी तीन खास बॅट देण्यात आल्या आहेत. त्याच्या बॅटबद्दल जी माहिती उपलब्ध आहे, त्यावरून असा अंदाज लावला जातो की, प्रत्येक बॅटची किंमत ही किमान एक ते दीड लाखांच्या घरात असेल. याबद्दल अधिकृत माहिती उपलब्ध नाही. पण या बॅट्सचे एक खास वैशिष्ट्य आहे. वैभव सूर्यवंशीच्या तीनही नवीन बॅट SS कंपनीच्या आहेत. वैभव सूर्यवंशीचा SS बॅटशी करार IPL 2025 दरम्यान झाला. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी वैभव सूर्यवंशीला मिळालेल्या तीन बॅटची स्वतःची एक खासियत आहे. या तिन्ही बॅटवर वैभवचे नावदेखील लिहिलेले आहे. वैभव पहिल्यांदाच इंग्लंडच्या भूमीवर खेळणार आहे. अशा वेळी तो नव्या बॅट काय कमाल करतो, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
Web Title: vaibhav suryavanshi 77 runs five sixes nine fours ready to play u19 match ind vs eng
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.