बुमराहविरुद्ध पारंपरिक पद्धतीचा वापर : बाँड

बाँड पुढे म्हणाला, ‘तुम्ही सामन्यात चांगली कामगिरी करण्यास उत्सुक असता.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 06:36 AM2020-02-19T06:36:08+5:302020-02-19T06:36:29+5:30

whatsapp join usJoin us
Use of the traditional method against Bumrah: Bond | बुमराहविरुद्ध पारंपरिक पद्धतीचा वापर : बाँड

बुमराहविरुद्ध पारंपरिक पद्धतीचा वापर : बाँड

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

वेलिंग्टन : आमच्या संघाने ज्याप्रकारे भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या माऱ्याला पारंपरिक पद्धतीने उत्तर दिले त्यापासून अन्य संघ बोध घेतील, असे मत न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज शेन बाँडने म्हटले आहे. बुमराहला न्यूझीलंडविरुद्ध वन-डे मालिकेत एकही बळी घेता आला नाही. मालिकेत अपेक्षेनुरूप कामगिरी करण्यात अपयशी ठरलेला बुमराह टीकेला सामोरे जात आहे, पण बाँडने त्याची पाठराखण केली.

बाँड म्हणाला, ‘जर तुमच्याकडे बुमराहसारखा गोलंदाज असतो त्यामुळे नक्कीच त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा असतात. माझ्या मते, न्यूझीलंडने धोका ओळखून त्याला समर्थपणे तोंड दिले. आमच्या फलंदाजांनी पारंपरिक पद्धतीने त्याच्याविरुद्ध खेळ केला. त्याच्यासोबत (बुमराह) संघात अनुभव नसलेले गोलंदाज (नवदीप सैनी व शार्दुल ठाकूर) होते. त्याचा न्यूझीलंडला लाभ मिळाला. आता प्रत्येक संघ बुमराहकडे धोका म्हणून बघेल आणि अन्य गोलंदाजांविरुद्ध आक्रमक खेळ करेल.’ भारताने मालिका ३-० ने गमावली असली तरी बुमराहची गोलंदाजी वाईट नव्हती, असेही बाँड म्हणाला.

बाँड पुढे म्हणाला, ‘तुम्ही सामन्यात चांगली कामगिरी करण्यास उत्सुक असता. त्याने चांगली गोलंदाजी केली, पण अनकेदा तुम्हाला बळी मिळत नाही.’ बाँडने सांगितले की, हा भारतीय गोलंदाज दोन कसोटी सामन्यांच्या आगामी मालिकेत प्रभावी ठरेल.
बाँड म्हणाला, ‘निराशाजनक कामगिरीनंतर सूर गवसणे नेहमी कठीण असते. त्याला या मालिकेपूर्वी जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. पण कसोटी सामन्यात त्याचे वर्चस्व राहील, यात मला शंका वाटत नाही.’

Web Title: Use of the traditional method against Bumrah: Bond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.