Join us

इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

इंग्लंड रग्बी युनियनचे प्रशिक्षक स्टीव्ह बोर्थविक यांनीही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2024 05:13 IST

Open in App

लंडन : इंग्लंड महिला क्रिकेटच्या अंतिम संघाची निवड करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर केला जात असल्याचा खुलासा इंग्लंड महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षक जाॅन लुईस यांनी केला आहे.

ते म्हणाले की, या तंत्रज्ञानामुळे त्यांना सामन्यांच्या बाबतीत महत्त्वाचा अभिप्राय मिळाला आहे. ॲशेस मालिका जिंकण्यातही मदत झाली आहे. लुईस म्हणाले की, मार्च २०२३ मध्ये भारतात महिला प्रीमियर लीगच्या (डब्ल्यूपीएल) पहिल्या सत्रात उत्तर प्रदेश संघाला प्रशिक्षण देताना त्यांना या तंत्रज्ञानाची माहिती मिळाली. इंग्लंड रग्बी युनियनचे प्रशिक्षक स्टीव्ह बोर्थविक यांनीही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला होता. इंग्लंड संघाचे मुख्य प्रशिक्षक लुईस म्हणाले की, एआय प्रणालीमुळे आम्हाला गतवर्षी महिलांच्या ॲशेसमध्ये फार्मात असलेल्या दोन खेळाडूंपैकी एका खेळाडूच्या निवडीचा निर्णय घेण्यास मदत झाली होती. आम्ही या तंत्रज्ञानाचा वापर केला आणि आम्हाला त्याचा खूप फायदा झाला.     

ते म्हणाले की, गतवर्षी आम्हाला एका खेळाडूची निवड करायची होती. आम्ही बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघ पाहून त्यानुसार आमचा बलाढ्य संघ निवडला. आम्ही सर्वोत्तम गोलंदाज निवडली. हा निर्णय आमच्यासाठी फायद्याचा ठरला. त्यामुळे आम्हाला टी-२० मालिका जिंकण्यास मदत मिळाली आणि आम्ही ऑस्ट्रेलियावर २-१ असा विजय मिळवला.

टॅग्स :इंग्लंडआर्टिफिशिअल इंटेलिजन्स