उत्तर प्रदेश प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील पहिला सामना रिंकू सिंहचा मेरठ मावेरिक्स आणि कानपूर सुपरस्टार्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात रिंकूच्या संघाने ८६ धावांनी विजय नोंदवला. रिंकू सिंह म्हटलं की, तो आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. पण यावेळी मॅच फिनिशिरच्या रुपात छाप सोडणारा रिंकू आपल्या गोलंदाजीमुळे चर्चेत आलाय. त्याने फक्त गोलंदाजी केली नाही तर पहिल्याच चेंडूवर त्याने प्रतिस्पर्धे संघातील फलंदाजाला क्लीन बोल्ड केल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पहिल्याच चेंडूवर पेश केला फिरकीचा जादुई नजराणा
लखनऊच्या भारत रत्न श्री अटल बिहारी वाजपेयी स्टेडियम रंगलेल्या कानपूर सुपरस्टार्स विरुद्धच्या सामन्यात रिंकून गोलंदाजी करत सर्वांनाच चकीत केले. मेरठ मावेरिक्स संघाचे नेतृत्व करणारा रिंकू पॉवर प्लेमध्येच स्वत: गोलंदाजीला आला. २ षटके गोलंदाजी करताना त्याने १८ धावा खर्च करून एक विकेट घेतली. पार्ट-टाइम ऑफ स्पिनरच्या रुपात त्याने पहिल्याच चेंडूवर आदर्श सिंह याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर रिंकून आक्रमक अंदाजात आपल्या पहिल्या विकेटच सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे.
रिंकूच्या संघातील या हिरोनं वेधलं लक्ष
रिंकूनं नाणेफेक गमावल्यावर मेरठ मावेरिक्स संघ पहिल्यांदा फलंदाजीसाठी मैदानात उतरला. अक्षय दुबे याने २६ चेंडूत ४४ आणि ऋतुराज शर्मानं ३६ चेंडूत ६० धावांची खेळी करत संघाला दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर पिक्चरमध्ये आला तो माधव कौशिक. या पठ्ठ्यानं चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन ३१ चेंडूत १० चौकार आणि ७ षटकाराच्या मदतीने ३०६ च्या स्ट्राइक रेटनं नाबाद ९५ धावा कुटल्या. त्याचं शतक अवघ्या ५ धावांनी हुकले. पण त्याच्या खेळीच्या जोरावर २२५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना कानपूर सुपरस्टार्स संघ निर्धारित २० षटकात ९ विकेट्सच्या मोबदल्यात १३९ धावांपर्यंतच मजल मारू शकला.