Join us  

Video: ...म्हणून मुंबई इंडियन्सचा सदस्य असल्याचा रोहित शर्माला वाटतो अभिमान

मुंबई इंडियन्स संघाचे मालक मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी निता अंबानी यांनी दिवाळीच्या निमित्तानं विशेष पार्टीचं आयोजन केलं होतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 10:26 AM

Open in App

मुंबई इंडियन्स संघाचे मालक मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी निता अंबानी यांनी दिवाळीच्या निमित्तानं गुरुवारी विशेष पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टिला मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी जातीनं हजेरी लावली होती. यावेळी मुंबई इंडियन्सच्या सर्व सदस्यांना दिवाळी भेट देण्यात आली. संघाच्या वाटचालीबद्दल बोलताना कर्णधार रोहित शर्मा थोडासा भावुक झालेला पाहायला मिळाला. या संघाच्या सदस्य असल्याचा आपल्याला का अभिमान वाटतो, याचे गुपित त्यानं यावेळी सांगितले.

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल) सर्वाधिक चार जेतेपदं पटकावण्याचा मान मुंबई इंडियन्सने पटकावला आहे. आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ म्हणून आता मुंबई इंडियन्स आघाडीवर आहे. विशेष म्हणजे मुंबईने ही चारही जेतेपद रोहितच्या नेतृत्वाखाली जिंकली आहेत आणि आयपीएलमध्ये सर्वाधिक जेतेपद जिंकणारा तो यशस्वी कर्णधार ठरला आहे. 2019च्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करत जेतेपदाचा चौकार मारला. 

या सर्व यशाचा फ्लॅशबॅक रोहितनं गुरुवारी घेतला. मुंबई इंडियन्सनं शनिवारी रोहितचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यात रोहित म्हणाला की,''मी, रितिका आणि समायरा यांच्याकडून  तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. मुंबई इंडियन्स हे माझं कुटुंबच आहे. आम्ही सर्व एका कुटुंबाप्रमाणे राहतो, खेळतो आणि हीच आमची खरी ताकद आहे. मला अजूनही आठवतं की 2011मध्ये या संघाशी जोडलो गेलो आणि 2013पर्यंत आमच्याकडे एकही जेतेपद नव्हतं. आता आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ म्हणून आम्ही येथे उभे आहोत. त्याचा मला आनंद होतो आणि म्हणून या संघाचा सदस्य असल्याचा मला अभिमान आहे. भविष्यातही हा संघ अशीच कामगिरी करेल, याची मला खात्री आहे.''

 

टॅग्स :रोहित शर्मामुंबई इंडियन्स