Join us

Jasprit Bumrah Weds Sanjana Ganesan : जसप्रीत बुमराह- संजना गणेशन यांच्या लग्नाचे Unseen फोटो अन् Video

Jasprit Bumrah Weds Sanjana Ganesan : भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) अखेर लग्न बंधनात अडकला. स्पोर्ट्स प्रेझेंटर संजना गणेशन ( Sanjana Ganesan) हिच्यासोबत त्यानं सोमवारी ( 15 March) लग्न केलं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 14:42 IST

Open in App

भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) अखेर लग्न बंधनात अडकला. स्पोर्ट्स प्रेझेंटर संजना गणेशन ( Sanjana Ganesan) हिच्यासोबत त्यानं सोमवारी ( 15 March) लग्न केलं. जसप्रीतच्या लग्नाआधीच्या सर्व समारंभ ( pre-wedding rituals ) रविवारी पार पडले आणि आता आज लग्न झाले. जसप्रीतच्या लग्नाला फक्त २० पाहुण्यांना उपस्थिती होती आणि त्यांना मोबाईल सोबत राखण्यास मनाई करण्यात आलेली होती. त्यामुळे या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोंव्यतिरिक्त अन्य फोटो कुणी पाहिले नव्हते. पण, आता त्यांच्या लग्नापूर्वीच्या समारंभासह अन्य फोटो व्हायरल झाले आहेत. चला पाहूया या दोघांच्या लग्नाचे Unseen Photo. ( Unseen photos & Video from Jasprit Bumrah, Sanjana Ganesan's pre-wedding and wedding ceremonies)

भारत-इंग्लंड ( India vs England) यांच्यातल्या चौथ्या कसोटीच्या आधी जसप्रीतनं सुट्टी मागितली होती आणि त्यामागे लग्न हे कारण असल्याची चर्चा गेले अनेक दिवस सुरू होती. अखेर त्या खऱ्या ठरल्या.'' प्रेम, जर ते योग्य असेल, तर आपल्याला योग्य मार्ग दाखवतं, आम्ही दोघं नवीन प्रवास सुरू करत आहोत. आजचा दिवस हा  माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा आहे आणि या नव्या प्रवासाच्या बातमी तुमच्यासोबत वाटताना आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. हा आनंद तुमच्याशिवाय अपूरा आहे, असे जसप्रीत बुमराह आणि संजना गणेश यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली.

Unseen Photo & Video

 

टॅग्स :जसप्रित बुमराहसंजना गणेशन