क्वीन्सटाऊन : विजयाच्या लाटेवर स्वार झालेल्या भारताला आयसीसी अंडर-१९ विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व सामन्यात आज शुक्रवारी बांगलादेशाविरुद्ध खेळायचे आहे. सामन्यात भारताचे पारडे जड असले तरी प्रतिस्पर्धी संघाला सहज घेण्याची चूक पृथ्वी शॉ याच्या नेतृत्वाखालील संघाने करू नये.तीन वेळेचा चॅम्पियन भारताला साखळीत कुठलेही आव्हान मिळाले नव्हते. क गटात दुसºया स्थानावर राहिलेल्या बांगलादेशला अखेरच्या सामन्यात इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे भारताने झिम्बाब्वेवर दहा गड्यांनी विजय नोंदविला होता. मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये क्वालालम्पूरला झालेल्या आशिया चषकात बांगलादेशने भारताचा पराभव करीत स्पर्धेबाहेर ढकलले होते. सध्याच्या संघातील भारताचे सहा खेळाडू रणजी करंडक खेळतात तर बांगलादेशचे पाच खेळाडू राष्टÑीय लीग खेळतात. भारताचा डावखुरा फिरकीपटू मुकुल रॉयने दहा गडी बाद केले असून पृथ्वी शॉ आणि शुभमान गिल यांनी भरपूर धावा काढल्या आहेत. (वृत्तसंस्था)आयपीएल दरवर्षी; विश्वचषकाची संधी एकदाच : द्रविडआयपीएलबद्दल क्रिकेटपटूंमध्ये कमालीची क्रेझ आहे. सध्या अंडर-१९ संघ विश्वचषक खेळत असून, या संघातील खेळाडूंवर बंगळुरू येथे आयपीएल-११ च्या लिलावात चांगली बोली लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर संघाचे कोच राहुल द्रविड यांनी आयपीएलऐवजी विश्वचषकावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे. तीन वेळचा चॅम्पियन भारत आज शुक्रवारी बांगलादेशविरुद्ध उपांत्यपूर्वसामना खेळेल.कर्णधार पृथ्वी शॉ, शुभमान गिल, हिमांशू राणा, अभिषेक शर्मा, रियान पराग, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, अर्शदीपसिंग आणि हार्विक देसाई यांची नावे लिलावात आहेत.कोच द्रविड म्हणाले, ‘विश्वचषकाची स्पर्धा सुरू असली तरीही सध्या खेळाडूंमध्ये आयपीएलच्या लिलावाची चर्चा सुरू आहे. खेळाडूंचे लक्ष स्पर्धेवर असणे गरजेचे आहे. आयपीएल लिलाव प्रत्येक वर्षी होणार. विश्वचषकाची संधी चार वर्षांत पुन्हा येणार नाही. मी खेळाडूंना बांगलादेशविरुद्ध लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे.’आयपीएल लिलावाच्या नादात खेळाडूंनी बांगलादेशविरुद्ध सामन्याची तयारी विसरू नये, असा सल्ला राहुल द्रविडने आपल्या खेळाडूंना दिला. बांगला देशविरुद्धचा सामना जिंकल्यास भारताची उपांत्य फेरीत पाकिस्तानशी गाठ पडणार आहे.भारत : पृथ्वी शॉ (कर्णधार), शुभमान गिल, आर्यन जुयाल, अभिषेक वर्मा, अर्शदीप सिंग, हार्विक देसाई, मनजोत कालरा, कमलेश नागरकोटी, पंकज यादव, रियान पराग, ईशान पोरेल, हिमांशू राणा, अनुकूल रॉय, शिवम मावी, शिवासिंग.बांगलादेश : सैफ हसन (कर्णधार), अफीफ हुसैन, अमीनुल इस्लाम, हसन महमूद, महिदुल इस्लाम अंकोन, मोहम्मद नईम, मोहम्मद रकीब, नईम हसन, पिनाक घोष, काजी ओनिक, रबीबुल हक, रोनी हुसैन, शकील हुसैन, टीपू सुल्तान, तौहीद हदय .
- Cricket Buzz»
- बातम्या»
- अंडर १९ विश्वचषक : भारत- बांगलादेश ‘आमने-सामने’ ,आज उपांत्यपूर्व लढत
अंडर १९ विश्वचषक : भारत- बांगलादेश ‘आमने-सामने’ ,आज उपांत्यपूर्व लढत
विजयाच्या लाटेवर स्वार झालेल्या भारताला आयसीसी अंडर-१९ विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व सामन्यात आज शुक्रवारी बांगलादेशाविरुद्ध खेळायचे आहे. सामन्यात भारताचे पारडे जड असले तरी प्रतिस्पर्धी संघाला सहज घेण्याची चूक पृथ्वी शॉ याच्या नेतृत्वाखालील संघाने करू नये.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 01:07 IST