हम्बनटोटा : भारताच्या १९ वर्षाखालील क्रिकेट संघाने श्रीलंकेला क्लिनस्विप देण्याच्या दिशेने दमदार पाऊल टाकले आहे.श्रीलंकेचा पहिला डाव ३६१ धावात आटोपल्यावर फॉलोआॅन देत दुसऱ्या डावात ४७ धावांवर तीन गडी बाद केले आहेत. मोहित जांगडा याने चार गडी बाद केले. पहिल्या डावातील तो भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. यतिन मंगवानी, आयुष बडोनी आणि सिद्धार्थ देसाई यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा, नुवानिंदू फर्नांडो आणि कलहरा सेनारत्ने हे खेळपट्टीवर होते. भारताच्या पहिल्या डावातील धावसंख्येपेक्षा २५० ने मागे आहे आणि त्यांचे अजून सात गडी शिल्लक आहेत.पहिल्या डावात एकही गडी बाद न करु शकलेल्या अर्जुन तेंडुलकर याने दुसºया डावात एक गडी बाद केला. भारताने पहिला डाव आठ गडी बाद ६१३ धावांवर घोषित केला आहे.श्रीलंकेच्या दुसºया डावाची सुरुवातही निराशाजनक झाली. संघाच्या ११ धावा झाल्या असतानाच अर्जुन तेंडुलकरने मिशाराला बाद करत श्रीलंकेला पहिला धक्का दिला. त्यानंतर आलेल्या परेराला मंगवानी याने स्थिराऊ दिले नाही. परेरा आठ धावा काढून तंबूत परतला. फर्नांडो चांगली फलंदाजी करत असतानाच त्याला बडोनीने २५ धावांवर बाद केले.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- १९ वर्षांखालील कसोटी: भारताची श्रीलंकेवर आघाडी
१९ वर्षांखालील कसोटी: भारताची श्रीलंकेवर आघाडी
श्रीलंकेला क्लिनस्विप देण्याच्या दिशेने भारताचे दमदार पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 01:12 IST