Join us

Umran Malik IPL 2022, SRH vs DC Live Updates : उम्रान मलिकने स्वतःचाच विक्रम मोडला, IPL इतिहासातील दुसरा सर्वात वेगवान चेंडू फेकला, Video 

IPL 2022, Sunrisers Hyderabad vs  Delhi Capitals Live Updates : डेव्हिड वॉर्नर व रोव्हमन पॉवेल या जोडीनं आज सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 22:56 IST

Open in App

IPL 2022, Sunrisers Hyderabad vs  Delhi Capitals Live Updates : डेव्हिड वॉर्नर व रोव्हमन पॉवेल या जोडीनं आज सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. ८ वर्षांनंतर हैदराबादविरुद्ध खेळणाऱ्या वॉर्नरने ( David Warner) आपल्या कामगिरीतून मागील पर्वातील अपमानाची सव्याज परतफेड केली. त्यानं चौथ्या विकेटसाठी पॉवेलसह  ( Rovman Powell) ६६ चेंडूंत १२२ धावांची नाबाद भागीदारी करताना दिल्ली कॅपिटल्सला ३ बाद २०७ धावांचा डोंगर उभा करून दिला. १९वं षटक संपल्यानंतर पॉवेल ४९, तर वॉर्नर ९२ धावांवर खेळत होता. पण, शतकाचा विचार न करता वॉर्नरने स्ट्राईकवर असलेल्या पॉवेलला नैसर्गिक खेळ करण्यास सांगितला. ( पाहा IPL 2022 - SRH vs DC सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड

मनदीप सिंग ( ०) पहिल्याच षटकात माघारी परतल्यानंतर वॉर्नर व मिचेल मार्श यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला.  भुवनेश्वर कुमारने चांगली सुरूवात करून दिली. भुवीने त्याच्या पहिल्या दोन षटकांत ११ चेंडू निर्धाव फेकले व १ धाव देत १ विकेट घेतली. सीन अ‍ॅबोटने DC ला दुसरा धक्का देताना मार्शला ( १०) माघारी पाठवले. रिषभ पंत ( २६) व वॉर्नर यांनी २९ चेंडूंत ४८ धावांची भागीदारी करून दिल्लीची गाडी रुळावर आणली. वॉर्नर व पॉवेल ही जोडी बरसली. वॉर्नर ५८ चेंडूंत १२ चौकार व ३ षटकारांसह ९२ धावांवर नाबाद राहिला. पॉवेलने ३५ चेंडूंत ३ चौकार व ६ षटकारांसह नाबाद ६७ धावा केल्या.  

२०व्या षटकात उम्रान मलिकनेही विक्रमी कामगिरी केली. त्याने १५७kmph च्या वेगाने चेंडू टाकला. त्याआधी त्याने याच सामन्यात १५६kmphच्या वेगाने चेंडू फेकला होता. उम्रानने आज आयपीएल इतिहासातील दुसरा वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम नावावर केला.

आयपीएलमधील सर्वात वेगवान चेंडू ( Fastest deliveries in IPL history)

  • शॉन टेट - 157.3kmph.
  • उम्रान मलिक - 157kmph (आज).
  • अॅनरिच नॉर्खिया - 156.2kmph.
  • उम्रान मलिक - 156kmph (आज).
  • अॅनरिच नॉर्खिया - 155.2kmph.

 

टॅग्स :आयपीएल २०२२सनरायझर्स हैदराबाददिल्ली कॅपिटल्स
Open in App