Join us  

क्रिकेटच्या सामन्यात वेळेपूर्वीच पंचांनी घेतला 'लंच ब्रेक', पण का...

आता तर पंचांनीच वेळेपूर्वी 'लंच ब्रेक' घेतल्याचे समोर आहे आहे. पण अशी वेळ त्यांच्यावर का आली, हा प्रश्न साऱ्यांना पडला असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 8:07 PM

Open in App

लंडन, अ‍ॅशेस 2019 : प्रत्येक खेळाचे काही नियम असतात. काही गोष्टी ठरलेल्या असतात आणि त्या ठरल्याप्रमाणे होत आहेत की नाही, हे काम पंचांचे असते. त्यामुळेच जर एखादा सामना वेळेत संपला नाही तर कर्णधारांना दंड करण्याचे अधिकारही पंचांना असतात. पण आता तर पंचांनीच वेळेपूर्वी 'लंच ब्रेक' घेतल्याचे समोर आहे आहे. पण अशी वेळ त्यांच्यावर का आली, हा प्रश्न साऱ्यांना पडला असेल.

सध्याच्या घडीला इंग्लंडमध्ये अॅशेस मालिका सुरु आहे. हा दुसरा सामना आजपासून लॉर्ड्सवर सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता. त्यामुळे या सामन्यात ऑस्ट्रेलिया बाजी मारून आघाडी वाढवणार की इंग्लंड विजय मिळवत ऑस्ट्रेलियाशी १-१ अशी बरोबरी करणार, ही उत्सुकता चाहत्यांना आहे.

आजच्या दिवशी लॉर्ड्सवर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे दुसऱ्या सामन्याचा टॉसही होऊ शकला नाही. पाऊस थांबत नसल्याने सामना सुरु होऊ शकत नाही. पण काही वेळाने सामना सुरु करायचा झाला तर त्यामध्ये अन्य कसलाही व्यत्यय येता कामा नये, अशी भूमिका पंचांनी घेतली. त्यामुळे पावसामुळे खेळ थांबलेला असतानाच त्यांनी वेळेपूर्वी 'लंच ब्रेक' घोषित केला, जेणेकरून जेव्हा सामना सुरु होईल तेव्हा 'लंच ब्रेक'साठी सामना लवकर थांबवावा लागू नये.

 अ‍ॅशेस मालिकेच्या पहिल्या सामन्यात स्टीव्हन स्मिथने सलग दोन शतके लगावली आणि इंग्लंडकडून सामना ऑस्ट्रेलियाकडे खेचून आणला. अ‍ॅशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना बुधवारपासून लॉर्ड्सच्या मैदानात होणार आहे. या सामन्यात इंग्लंडच्या रडारवर असेल तो स्मिथ. पण आता स्मिथला रोखण्यासाठी इंग्लंडच्या संघाने एक फंडा वापरण्याचे ठरवले आहे.

अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्यावर ऑस्ट्रेलियाने मोहोर उमटवली. ऑस्ट्रेलियाच्या या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो स्टीव्हन स्मिथ. कारण या सामन्याच्या दोन्ही डावात शतके झळकावत ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. इंग्लंडच्या दुसऱ्या डावाला नॅथन लिऑनने सहा विकेट्स घेत खिंडार पाडले आणि ऑस्ट्रेलियाने 251 धावांनी हा सामना जिंकला होता.

प्रतिस्पर्धी संघ

ऑस्ट्रेलिया - टीम पेन, डेव्हिड वॉर्नर, कॅमेरून बँक्रॉफ्ट, उस्मान ख्वाजा, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हीस हेड, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, पीटर सिडल, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड.

इंग्लंड - जो रूट ( कर्णधार), जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर, सॅम कुरन, जोए डेन्ली, जऐक लीच, जेसन रॉय, बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स. 

टॅग्स :अ‍ॅशेस 2019इंग्लंडआॅस्ट्रेलिया