Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: ...जेव्हा हार्दिक पांड्या रिपोर्टर होतो

बीसीसीआयनं शेयर केला धमाल व्हिडीओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 19:14 IST

Open in App

नवी दिल्ली: इंग्लंड दौऱ्यावर गेलेला भारतीय क्रिकेट संघ आयर्लंडविरुद्ध पहिला टी-20 सामान खेळणार आहे. या सामन्यानं भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात होईल. या दौऱ्याला सुरुवात होण्याआधी बीसीसीआयनं खेळाडूंचा एक व्हिडीओ शेयर केला आहे. यामध्ये खेळाडू मौजमजा करताना दिसत आहेत. बीसीसीआयनं शेयर केलेला व्हिडीओ खेळाडू विमानातून प्रवास करताना चित्रीत करण्यात आला आहे. या व्हिडीओत भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या रिपोर्टर होऊन सपोर्ट स्टाफच्या मुलाखती घेताना दिसत आहे. याशिवाय हार्दिकनं जवळपास सर्व खेळाडूंच्याही मुलाखती घेतल्या आहेत. यामध्ये युवा फिरकीपटू यजुर्वेंद्र चहालनं हार्दिकला साथ दिली आहे. हा संपूर्ण प्रकार अतिशय मजेशीर आहे. 

हार्दिक पटेलच्या रिपोर्टिंगचा हा व्हिडीओ 5 मिनिटं 33 सेकंदांचा आहे. संघाच्या चाहत्यांसाठी बीसीसीआयनं हा व्हिडीओ वेबसाईटवर शेयर केला आहे. हार्दिकनं या व्हिडीओच्या सुरुवातीला स्वत:ची आणि चहालची ओळख करुन दिली आहे. यानंतर त्यानं खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या मुलाखतींना सुरुवात केली आहे. कर्णधार विराट कोहलीला प्रश्न विचारत हार्दिकनं मुलाखत सत्राची सुरुवात केली आहे. 

टॅग्स :हार्दिक पांड्याभारतक्रिकेटबीसीसीआयइंग्लंडविराट कोहली