दुबई: भारतातील कोरोना व्हायरसची स्थिती पाहता यावर्षी आयपीएल स्पर्धा देशाबाहेर आयोजित करण्याचा विचार बीसीसीआयने जवळपास घेतला आहे. या निर्णयाची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.
आयोजनासाठी संयुक्त अरब अमिरात(यूएई) सर्वात उपयुक्त स्थळ असून २६ सप्टेबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत स्पर्धेचे आयोजन होऊ शकेल, असे बीसीसीआय सूत्रांचे मत आहे. दुबई स्पोर्ट्स सिटीचे क्रिकेट आणि स्पर्धा प्रमुख सलमान हनिफ यांनी आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धेच्या आयोजनासाठी आपल्या सुविधा सज्ज असल्याचे सांगून या चर्चेला बळ दिले आहे. (वृत्तसंस्था)