शारजाहच्या मैदानात युएईचा (UAE) संघाचा कर्णधार मुहम्मद वसीम याने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे. लिंबू टिंबू संघाचे नेतृत्व करणाऱ्या या पठ्ठ्यानं अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताचा हिटमॅन रोहित शर्मा याचा सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडीत काढला. अफगाणिस्तान विरुद्धच्या टी-२० सामन्यात धावांचा पाठलाग करताना UAE चा संघ कमी पडला. पण संघाचा कर्णधार मात्र 'हार कर जीतने वाला बाजीगर' ठरलाय. कारण त्याने या सामन्यात ३७ चेंडूत ६७ धावांची धमाकेदार खेळी करताना रोहित शर्माच्या वर्ल्ड रेकॉर्डला सुरुंग लावलाय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रोहित शर्माला मागे टाकत UAE चा कॅप्टन बनला नवा सिक्सर किंग (Muhammad Waseem Leaves Rohit Sharma)
आशिया कप स्पर्धेआधी युएई, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या तीन देशांत तिरंगी टी-२० मालिका खेळवण्यात येत आहे. अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना UAE संघाला पराभवाचा सामना करावा लागला. पण कर्णधाराने सामना जिंकण्यासाठी जोर लावत दमदार खेळी केली. मुहम्मद वसीम याने आपल्या अर्धशतकी खेळीत ४ चौकारासह ६ गगनचुंबी षटकार मारले. या सामन्यात त्याच्या भात्यातून दुसरा षटकार निघताच त्याने रोहितला मागे टाकले. टी-२० संघाचे नेतृत्व करताना सर्वाधिक षटकार मारण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आता UAE च्या मुहम्मद वसमीच्या नावे झाला आहे.
हा भारतीय गोलंदाज फिटनेस टेस्टमध्ये नापास; मॅच आधी आली संघातून 'आउट' होण्याची वेळ!
आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारे कर्णधार (Most Sixes As Captain In T20I Cricket)
मुहम्मद वसीम (Muhammad Waseem) ११० षटकार
रोहित शर्मा (Rohit Sharma) १०५ षटकार
इयॉन मॉर्गन (Eoin Morgan) ८६ षटकार
अरॉन फिंच (Aaron Finch) ८२ षटकार
केंडेल कडोवाकी-फ्लेमिंग (Kadowaki Fleming) ७९ षटकार
जोस बटलर (Jos Buttler) ६९ षटकार
तो रोहितच्या या वर्ल्ड रेकॉर्डचाही करतोय पाठलाग (Most sixes in T20I cricket)
रोहित शर्मा टी-२० मध्ये कर्णधाराच्या रुपात षटकार मारण्यात मागे पडला असला तरी आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड अजूनही त्याच्या नावे आहे. रोहित शर्मानं आपल्या टी-२० कारकिर्दीत २०५ षटकार मारले आहेत. त्यापाठोपाठ UAE कर्णधार मुहम्मद वसीम १७६ षटकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे. मार्टिन गप्टिल याच्या खात्यात १७३ तर जोस बटलरनं आपल्या आतापर्यंतच्या टी २० कारकिर्दीत १६० षटकार मारले आहेत.
Web Title: UAE captain Muhammad Waseem breaks Rohit Sharma's T20I Word Record He Becomes T20I Sixes King As Captain
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.