Join us  

U19CWC : टीम इंडियानं तब्बल 271 चेंडू व 10 विकेट्स राखून सामना जिंकला

भारतानं हा सामना एकही विकेट न गमवता जिंकला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 4:16 PM

Open in App

गतविजेत्या टीम इंडियानं 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात दणदणीत विजयाची नोंद केली. मंगळवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यातही टीम इंडियानं तोच फॉर्म कायम राखताना जपानचा धुव्वा उडवला. या सामन्यात टीम इंडियानं जपानचा संपूर्ण संघ 41 धावांत तंबूत पाठवला. 19 वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेतील ही आतापर्यंतची नीचांकी खेळी ठरली. भारतानं हा सामना एकही विकेट न गमवता जिंकला.

नाणेफेक जिंकून टीम इंडियाचा कर्णधार प्रियम गर्गनं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांची त्याचा या निर्णय योग्य ठरवला. वर्ल्ड कप स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या जपानच्या फलंदाजांना त्यांनी दुहेरी धाव करण्यापासून रोखले. सलामीवीर मार्कस थुर्गाटे ( कर्णधार ) आणि शू नोगोची यांनी पाच षटकं खिंड लढवली. कार्तिक त्यागीनं जपानला पहिला धक्का दिला. त्यानंतर आलेल्या नील दातेलाही पहिल्याच चेंडूवर कार्तिकनं माघारी पाठवले. त्यानंतर जपानची पडझड कायम राहिली. जपानच्या पाच फलंदाजांना तर भोपळाची फोडता आला नाही.

टॅग्स :19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कपभारतीय क्रिकेट संघजपान