U19 World Cup final : युवा ब्रिगेड 'मालामाल', राहुल द्रविडला 50 लाख तर प्रत्येक खेळाडूला मिळणार 30 लाख

अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला धूळ चारुन चौथ्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरणा-या अंडर -19 भारतीय संघासाठी बीसीसीआयने बक्षिसाची रक्कम जाहीर केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2018 14:07 IST2018-02-03T13:51:58+5:302018-02-03T14:07:37+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
U19 World Cup final: Young Brigade Malalal, Rahul Dravid will get 50 lakhs and each player will get 20 lakhs | U19 World Cup final : युवा ब्रिगेड 'मालामाल', राहुल द्रविडला 50 लाख तर प्रत्येक खेळाडूला मिळणार 30 लाख

U19 World Cup final : युवा ब्रिगेड 'मालामाल', राहुल द्रविडला 50 लाख तर प्रत्येक खेळाडूला मिळणार 30 लाख

ठळक मुद्देडावखुरा फलंदाज मनजोत कालराच्या नाबाद 101 धावांच्या शतकी खेळीच्या बळावर भारताने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियावर आठ विकेट राखून विजय मिळवला.  अंडर-19 संघाला घडवण्यात मोलाची भूमिका बजावणारा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला बक्षिसापोटी 50 लाख रुपये देण्यात येणार आहेत. 

मुंबई - अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला धूळ चारुन चौथ्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरणा-या अंडर -19 भारतीय संघासाठी बीसीसीआयने बक्षिसाची रक्कम जाहीर केली आहे. भारताच्या अंडर-19 संघाला घडवण्यात मोलाची भूमिका बजावणारा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला बक्षिसापोटी 50 लाख रुपये देण्यात येणार आहेत. 

अंडर-19 संघातील प्रत्येक खेळाडूला 30 लाख रुपये मिळणार आहेत. सपोर्ट स्टाफमधील प्रत्येक सदस्याला 20 लाख रुपये जाहीर झाले आहेत. डावखुरा फलंदाज मनजोत कालराच्या नाबाद 101 धावांच्या शतकी खेळीच्या बळावर भारताने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियावर आठ विकेट राखून विजय मिळवला.  



 

फायनलमध्ये रुबाबात दाखल झालेल्या भारताने शेवटच्या सामन्यातही तोच रुबाब कायम राखत ऑस्ट्रेलियाचे 217 धावांचे लक्ष्य आरामात पार केले. भारताचा कर्णधार सलामीवीर पृथ्वी शॉ ला सदरलँडने (29) धावांवर क्लीन बोल्ड केले. त्यानंतर पाकिस्तान विरुद्ध विजयाचा शिल्पकार ठरलेला शुभमन गिल फक्त (31) धावांवर बाद झाला. त्याला फिरकी गोलंदाज उप्पलने बाद केले.  नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताच्या युवा गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला 216 धावांवर रोखले. 

खेळाच्या एका टप्प्यावर ऑस्ट्रेलियाच्या चार बाद 183 धावा होत्या. ऑस्ट्रेलियाचा डाव मजबूत स्थितीत होता. ऑस्ट्रेलिया सहज 250 पर्यंत पोहोचेल असे वाटत होते. पण मोक्याच्या क्षणी भारतीय गोलंदाजांनी कामिगिरी उंचावली. ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या सहा विकेट फक्त 33 धावात गेल्या. 
 

Web Title: U19 World Cup final: Young Brigade Malalal, Rahul Dravid will get 50 lakhs and each player will get 20 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.