Join us  

U19 World Cup: श्रीलंकेला २५ चेंडूंत ५ धावा करता नाही आल्या, अफगाणिस्ताननं इतिहास रचला; आनंदात भन्नाट डान्स केला, Video 

U19 World Cup: अफगाणिस्तानच्या १९ वर्षांखालील संघानं गुरुवारी इतिहास रचला. अफगाणिस्तानच्या संघानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 11:27 AM

Open in App

U19 World Cup: अफगाणिस्तानच्या १९ वर्षांखालील संघानं गुरुवारी इतिहास रचला. अफगाणिस्तानच्या संघानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. श्रीलंकेविरुद्धच्या या लढतीत अफगाणिस्ताननं १३४ धावांचा यशस्वी बचाव केला. अफगाणिस्तानच्या पाच गोलंदाजांनी प्रत्येकी १ विकेट घेतली, तर बिलाल सामीनं दोन विकेट्स घेतल्या. श्रीलंकेला १३० धावांवरच समाधान मानावे लागले. या विजयानंतर अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी मैदानावरच भन्नाट डान्स केला.   श्रीलंकेला विजयासाठी २५ चेंडूंत ५ धावाही करता आल्या नाही. त्यांचा अखेरचा फलंदाज रनआऊट होऊन माघारी परतला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानकडून अल्लाह नूर ( २५), अब्दुल हादी ( ३७), नूर अहमद ( ३०)  यांनी चांगला खेळ केला, परंतु त्यांचा संघ ४७.१ षटकांत १३४ धावा करू शकला.  श्रीलंकेच्या विंजुआ रनपूलनं पाच विकेट्स घेतल्या. दुनिथ वेल्लालागेनं तीन बळी टिपले. प्रत्युत्तरात श्रीलंकेच्या फलंदाजांनी अती घाईत चार विकेट्स रन आऊटमध्ये गमावल्या. कर्णधार दुनिथनं सर्वाधिक ३४, तर रवीन डी सिल्वानं २१ धावा केल्या.   

टॅग्स :19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कपअफगाणिस्तानश्रीलंका
Open in App